भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानचा जयघोष करणा-या 15 जणांना अटक
By Admin | Published: June 20, 2017 06:49 PM2017-06-20T18:49:48+5:302017-06-20T18:49:48+5:30
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला. त्यानंतर काही भारतविरोधी लोकांनी पाकिस्तानचा नारा लगावला.
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 20 - आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला. त्यानंतर काही भारतविरोधी लोकांनी पाकिस्तानचा नारा लगावला. तसेच, फटाक्यांची आतषबाजी केली. याप्रकरणी येथील बुरहानपूरमधून 15 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.
येथील शाहपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी संजय पाठक यांनी सांगितले की, आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा विजय झाल्यामुळे जल्लोष साजरा केला. तसेच, भारतविरोधी घोषणाबाजी केली. दरम्यान, याप्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 120 (ब) आणि 124 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीतील भारत-पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना झाल्यानंतर मोठ्या संख्येने युवक घराबाहेर पडले आणि रॅली काढत भारतविरोधी घोषणाबाजी देत फटाके फोडले.
MP: 15 arrested in Burhanpur for raising Pro-Pak slogans & bursting crackers after Pakistan's win in final match against India on 18th June. pic.twitter.com/CRprlDQ256
— ANI (@ANI_news) June 20, 2017
Match ke baad inne Pak ki jeet ka jashn manaya. Report karane pe Sec120B, 124A ka antargat unhe giraftar kiya gaya: Station incharge,Shahpur pic.twitter.com/pfvycjnTwb
— ANI (@ANI_news) June 20, 2017
124A mein sapsht hai ki jo bhi aisa kritya karega jo ki rashtra ki garima ke vipreet ho uske virudh karwai ki jaegi: Sanjay Pathak, Shahpur pic.twitter.com/3qjSZX57GK
— ANI (@ANI_news) June 20, 2017