जुगार खेळणार्या १५ जणांना अटक, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
By admin | Published: December 31, 2014 12:05 AM2014-12-31T00:05:52+5:302014-12-31T19:00:27+5:30
शेवगाव तालुक्यातील गदेवाडी शिवारात एका शेतातील जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाने मंगळवारी रात्री छापा टाकला. यामध्ये १५ जणांना अटक करण्यात आली आहे. जुगाराच्या साहित्यासह सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील गदेवाडी शिवारात एका शेतातील जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाने मंगळवारी रात्री छापा टाकला. यामध्ये १५ जणांना अटक करण्यात आली आहे. जुगाराच्या साहित्यासह सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शेवगाव तालुक्यात गदेवाडी शिवारात रमेश नागू धनवडे यांच्या शेतातील शेततळ्यालगतच्या झाडाखाली जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांना मिळाली होती. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी विशेष पथक नियुक्त करून मंगळवारी रात्री अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात १५ जणांना अटक केली. रमेश निवृत्ती दुधाडे ( रा. शेवगाव), रामकिसन नारायण कुर्हाडे (रा. गदेवाडी), अनिल लक्ष्मण भोंगळे (रा. बोधेगाव), अनिल एकनाथ धनवडे (रा. गदेवाडी), फिरोजखान असिमखान पठाण (रा. पैठण). काकासाहेब अण्णासाहेब मार्कंडेय (रा.पैठण), विष्णू पुंजा गायकवाड (रा. पाथर्डी), कांताराम सीताराम पाचे (रा. पैठण), अरुण बबनराव म्हस्के (रा.पैठण), सोमनाथ गोरख मडके (रा.गदेवाडी), नारायण बन्सी पाखरे (रा. शेवगाव), कैलास द्वारका अंधारे (रा. बोधेगाव), कमरुद्दिन दगडू शेख (रा. बालमटाकळी), हरिभाऊ विठ्ठल सुपारे (रा. शेवगाव), रमेश भागू धनवडे ( रा. गदेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या जुगार्यांकडे २ लाख ७७ हजार ५८० रुपये रोख मिळाले. ३ लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी, ३८ हजार रुपये किमतीचे १५ मोबाईल असा माल हस्तगत केला. जुगाराच्या साहित्यासह जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ६ लाख १५ हजार ५८० एवढी आहे. वर्षभरातील जुगार अड्ड्यावर झालेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.