केरळमध्ये पिझ्झावर १५ टक्के 'फॅट टॅक्स'

By admin | Published: July 10, 2016 08:34 PM2016-07-10T20:34:17+5:302016-07-10T20:34:17+5:30

केरळ हे देशातील पहिलं राज्य आहे ज्याने रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा, बर्गर आणि सॅण्डविच यासारख्या जंक फूडवर १५ टक्के कर लावला आहे.

15 percent fat tax on pizza in Kerala | केरळमध्ये पिझ्झावर १५ टक्के 'फॅट टॅक्स'

केरळमध्ये पिझ्झावर १५ टक्के 'फॅट टॅक्स'

Next

ऑलाइन लोकमत
तिरुअनंतपूरम, दि. १० : केरळ हे देशातील पहिलं राज्य आहे ज्याने रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा, बर्गर आणि सॅण्डविच यासारख्या जंक फूडवर १५ टक्के कर लावला आहे. हा नियम मॅक्डोनल्ड, डॉमिनोज यासारख्या फूड चेन्सला लागू होणार आहे. केरळ सरकारच्या पॉलिसीनुसार नवे नियम निश्चित करण्यात आले आहे. केरळ सरकारनं 'फॅट टॅक्स' लागू करण्याची घोषणा शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली. यातून सरकारला १० कोटींचा महसूल मिळेल अशी आशा आहे.

जंक फूडचा आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम होतो. त्यामुळेच अशाप्रकारच्या खाद्य पदार्थांवर केरळ सरकारनं थेट 'फॅट टॅक्स' लागू केला आहे.

Web Title: 15 percent fat tax on pizza in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.