आंध्रात कृष्णा नदीत १५ भाविकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 04:20 IST2017-11-13T04:20:22+5:302017-11-13T04:20:49+5:30
येथून जवळच असलेल्या गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या पवित्र संगमापाशी रविवारी सायंकाळी एक यांत्रिक बोट उलटून १५ भाविकांचा मृत्यू झाला तर १0 जण बेपत्ता आहेत.

आंध्रात कृष्णा नदीत १५ भाविकांचा मृत्यू
ठळक मुद्देगोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या पवित्र संगमापाशी रविवारी सायंकाळी बोट उलटून १५ भाविकांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
विजयवाडा : येथून जवळच असलेल्या गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या पवित्र संगमापाशी रविवारी सायंकाळी एक यांत्रिक बोट उलटून १५ भाविकांचा मृत्यू झाला तर १0 जण बेपत्ता आहेत. कृष्णा नदीतील भवानी बेटावरून दोन्ही नद्यांच्या संगमापाशी पाण्यात तयार झालेल्या भोवर्यात अडकून ही बोट उलटली, असे पोलिसांनी सांगितले. बेपत्ता भाविकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आले. एका खासगी कंत्राटदाराकडून ही बोट चाल्विली जाते. रविवार आणि कृष्ण मास यामुळे भाविकांची गर्दी जास्त होती.