दोन वर्षांत १५ हजार नवजात बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 06:24 AM2020-03-05T06:24:16+5:302020-03-05T06:24:21+5:30

मागील दोन वर्षांत गुजरातमध्ये उपचारादरम्यान १५,००० नवजात बालकांचा मृत्यू झाल्यावरुन काँग्रेसने गुजरातमधील भाजप सरकारवर कडाडून हल्ला करीत मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

15 Thousands of infants die in two years | दोन वर्षांत १५ हजार नवजात बालकांचा मृत्यू

दोन वर्षांत १५ हजार नवजात बालकांचा मृत्यू

googlenewsNext

नवी दिल्ली : मागील दोन वर्षांत गुजरातमध्ये उपचारादरम्यान १५,००० नवजात बालकांचा मृत्यू झाल्यावरुन काँग्रेसने गुजरातमधील भाजप सरकारवर कडाडून हल्ला करीत मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मंगळवारी विधानसभेत काँग्रेस आमदारांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मान्य केले की, २०१८ आणि २०१९ राज्यभरात १५,०१३ नवजात बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पटेल यांच्याकडे आरोग्य खातेही आहे. गुजरातमधील सर्व जिल्ह्यांतील इस्पितळांतील नवजात शिशू कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या या बालकांचा मृत्यू झाला.
कोणी जाब विचारणार की नाही?
बुधवारी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंबंधीच्या वृत्ताचा हवाला देत नवजात बालकांच्या मृत्यूस भाजप सरकारला जबाबदार धरले. १५,०१३ नवजात बालकांचा मृत्यू झाला. दरदिवशी २० नवजात बालक मरण पावत आहेत. अहमदाबादेत सर्वाधिक ४,३२२ नवजात बालकांचा मृत्यू झाला. अमित शहा यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. या बालकांचा आक्रांत तरी ऐकायला येतो का? कोणी याबद्दल जाब विचारणार की नाही? टीव्ही मीडिया साहस दाखवील का? अशा प्रश्नांची टिष्ट्वटवरून सरबत्ती करीत सुरजेवाला यांनी भाजप सरकारला घेरत या गंभीर मुद्याकडे मीडियाचे लक्ष वेधले.
>सर्वाधिक मृत्यू अहमदाबादेत
संसद भवन परिसरात काँग्रेसचे प्रवक्ते शक्तिसिंह गोहील यांनी सांगितले की, नवजात शिशू उपचार कक्षांसाठी काही नियम आहेत. संसर्ग पसरू नये म्हणून दोन आजारी नवजात बालकांत तीन मीटर अंतर असावे; परंतु आम्ही भेट दिली असताना बालकांना एकमेकांजवळ ठेवण्यात आल्याचे दिसले. पंतप्रधान आणि गृहमंत्री या मुद्यांवर संवेदनशील नाहीत. सर्वाधिक मृत्यू अहमदाबादेत झाले. त्यानंतर राजकोटचा क्रमांक लागतो.
मुख्यमंत्री याच मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.

Web Title: 15 Thousands of infants die in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.