१५ वर्षीय विद्यार्थिनीचे कन्हैयाला खुल्या डिबेटचे आव्हान
By admin | Published: March 6, 2016 11:41 AM2016-03-06T11:41:43+5:302016-03-06T12:03:14+5:30
जेएनयू विद्यार्थी संघटनेचा कन्हैया कुमारला लुधियानामधील एका १५ वर्षीय विद्यार्थीनीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयावर खुल्या डिबेटचे आव्हान दिले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लुधियाना, दि. ६ - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका करणारा जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला लुधियानामधील एका १५ वर्षीय विद्यार्थीनीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयावर खुल्या डिबेटचे आव्हान दिले आहे. जान्हवी बेहेल असे या विद्यार्थीनीचे नाव असून, अलीकडेच २६ फेब्रुवारीला प्रजासत्ताक दिनी स्वच्छ भारत अभियानातील योगदानासाठी तिला सन्मानित करण्यात आले होते.
नरेंद्र मोदींची भारतातील नागरीकांनी पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर तिखट शब्दात टीका करण्यापूर्वी विचार कर असा सल्ला जान्हवीने कन्हैयाला दिला आहे. संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे पण याचा अर्थ आपण मर्यादा ओलांडावी असा होत नाही.
कन्हैया कुमार आणि आणखी काही जण आपल्या राजकीय फायद्यासाठी मूलभूत अधिकाराचा गैरवापर करत आहेत असा आरोप जान्हवीने हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना केला. मी कन्हैया कुमार सांगेल तिथे, सांगेल तेव्हा त्याच्याबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर खुली चर्चा करायला तयार आहे.
घरात बसून बोलणे सोपे असते. त्यापेक्षा कन्हैयाने पंतप्रधानांसारखे कार्य करण्यावर लक्ष दिले पाहिजे. कैन्हयाने नरेंद्र मोदींवर टीका करण्यापेक्षा ज्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या त्यांच्याविषयी बोलला असता तर बरे झाले असते असे जान्हवीने म्हटले आहे. जान्हवी डीएव्ही पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी आहे. रक्षा ज्योती फाऊंडेशन या एनजीओची ती सक्रीय सदस्यही आहे. स्वच्छ भारत अभियानातील योगदानाबद्दल तिला अलीकडे प्रजासत्ताक दिनी सन्मानित करण्यात आले होते.