दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी लष्कर वापरणार 15 वर्षापूर्वीची रणनीती
By admin | Published: May 12, 2017 01:06 PM2017-05-12T13:06:48+5:302017-05-12T13:13:11+5:30
सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापतींमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. त्यांच्या कुरापती रोखण्यासाठी भारतीय भारत लष्कर आक्रमक धोरण स्वीकारणार आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, 12 - सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापतींमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. त्यांच्या कुरापती रोखण्यासाठी भारतीय भारत लष्कर आक्रमक धोरण स्वीकारणार आहे. 15 वर्षापूर्वी बंद करण्यात आलेलं कासो ऑपरेशन भारतीय लषकर पुन्हा अमलात आणणार आहे. लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कासोचा वापर काश्मीरमधील दहशतवाद प्रभावित कुलगाम, पुलवामा, तराल, बडगाम आणि सोपियान येथे मोठ्या प्रमाणात केला जाईल.
सहा महिन्यांपूर्वीच लष्करात रूजू झालेले आणि काश्मीरमध्ये रोल मॉडेल बनलेले तरुण लेफ्टनंट उमर फय्याज (22) यांची दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. त्यामुळे लष्कराने कासो ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय सुरक्षा दलाने गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये 4000 सैनिकांच्या मदतीने अभियान चालवले होते. यावरुनच भारतीय लष्कराच्या नव्या रणनीतीचे संकेत मिळत आहेत. दोन भारतीय जवानांचे शिरच्छेद केल्यानंतर भारतीय लष्कारांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 3 महिन्यांत आठ जण ठार तर 17 जण जखमी झाले आहेत.
काय आहे कासो ऑपरेशन - लष्कराने 15 वर्षांपूर्वी स्थानिकांच्या विरोधानंतर कासो ऑपरेशन बंद केले होते. 2001 नंतर गोपनीय माहिती मिळाल्यानंतरच घेराव घालणे आणि शोध मोहीम चालवण्यात आली होती. कासो म्हणजे, घेराव घालणे आणि शोध मोहीम होय. कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन असेही कासो ऑपरेशनला म्हटले जाते.
दहशतवादांच्या कुरापती -
2016 या कॅलेंडर वर्षात घुसखोरीचे प्रयत्न आणि कुंपणाच्या तारेतून झालेली घुसखोरी यात 2015 वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. गृहमंत्रालयाच्या 2016-17 वर्षाच्या वार्षिक अहवालात घुसखोरीचे प्रयत्न आणि कुंपणाच्या तारेतून झालेली घुसखोरी कमी झाली होती; परंतु ती फार मोठ्या प्रमाणावर 2016 मध्ये वाढली आहे. 2016 मध्ये 322 दहशतवादी हल्ले झाले होते, तर 2015मध्ये ते 208 होते. 2016 मध्ये सुरक्षा दलांचे कर्मचारी ठार मारले जाण्याचे प्रमाणही वाढले आहे.