मस्तच! शेतकऱ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्याने तयार केलं 'हे' खास App; एका क्लिकवर महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 11:10 AM2022-04-04T11:10:17+5:302022-04-04T11:12:51+5:30

Golden Crop App : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यामधील कृषी व्यवस्थापन हा विभाग वापरता येत आहे. आणि भविष्यात माती परीक्षण, पीक निवड हे विभाग देखील वापरता येणार आहेत.

15 year old Tamil Nadu boy develops Golden Crop App to help farmers increase yield, earn profits | मस्तच! शेतकऱ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्याने तयार केलं 'हे' खास App; एका क्लिकवर महत्त्वाची माहिती

मस्तच! शेतकऱ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्याने तयार केलं 'हे' खास App; एका क्लिकवर महत्त्वाची माहिती

Next

मुंबई - चुकीच्‍या पीक निवडीमुळे किंवा चुकीची विविध प्रकारची बियाणे वापरल्‍यामुळे गावामधील शेतकरी कमी पीक उत्‍पादनामुळे चिंतित असल्‍याचे लक्षात आल्याने अरविंद या पंधरा वर्षीय मुलाने शेतकऱ्यांना जमिनीचा प्रकार व हवामान स्थितींनुसार योग्‍य पीक निवडण्‍यास मदत करण्‍यासाठी अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप मोफत असून, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यामधील कृषी व्यवस्थापन हा विभाग वापरता येत आहे. आणि भविष्यात माती परीक्षण, पीक निवड हे विभाग देखील वापरता येणार आहेत.

शेतकऱ्यांना मदत करण्‍यासाठी अरविंदने अ‍ॅप गोल्‍डन क्रॉप विकसित करण्‍याचे ठरवले. जे शेतकऱ्यांना पीक वाढीसंदर्भातील विविध पैलूंसोबत योग्‍य पीक निवडीसंदर्भात मार्गदर्शन करते आणि जमिनीचा प्रकार समजण्‍यास मदत करते. हे अ‍ॅप अशा पिकांची शिफारस करते, जे वापरकर्त्याला शेतजमिनीतील मातीचा प्रकार तसेच परिसरातील स्थानिक हवामान परिस्थिती ओळखण्यासाठी निवडलेल्या महिन्याकरिता भौगोलिक स्थानाचा फायदा घेऊन चांगले उत्पादन देऊ शकतात. 

हे अ‍ॅप पीक कापणीसाठी लागणारे दिवस, पिकाचा बाजारभाव इत्यादींसह विशिष्ट माहिती देखील प्रदान करते. जेणेकरुन वापरकर्त्याला उत्पादनाचे खरे मूल्य समजण्यास मदत होईल. अ‍ॅप शेतकऱ्यांना मातीची चाचणी करण्याची सुविधा देते. वापरकर्त्याला स्थानिक माती परीक्षण प्रयोगशाळेशी कनेक्‍ट करते. ज्यामुळे शेतक-यांना योग्य पीक निवडण्यामध्‍ये मदत होते. युअर क्रॉप वैशिष्ट्याचा वापर करून शेतकरी त्यांच्या पिकांचा मागोवा घेऊ शकतात. 

येणाऱ्या पुढील महत्त्वाच्या घटनेबद्दल सूचना मिळवू शकतात. शेतकरी त्यांच्या पिकाची निरोगी पीकाशी तुलना करून त्‍यांच्‍या पिकाचे आरोग्य देखील तपासू शकतात. सध्‍या कार्यरत असलेल्‍या अ‍ॅपला अरविंद आणखी सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह अद्ययावत करत आहे. लवकरच शेतकऱ्यांना स्थानिक प्रादेशिक भाषांमध्येही अ‍ॅप उपलब्ध करून देण्याची अपेक्षा आहे, असे तामिळनाडू येथील अरविंद यांनी सांगितले.

 

Web Title: 15 year old Tamil Nadu boy develops Golden Crop App to help farmers increase yield, earn profits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.