सव्वा वर्षात निमलष्कराच्या १५० जवानांची आत्महत्या
By admin | Published: May 15, 2015 12:21 AM2015-05-15T00:21:18+5:302015-05-15T00:21:18+5:30
निमलष्कर दलाच्या १५० पेक्षा जास्त जवानांनी २०१४ आणि या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत विविध कारणांनी आत्महत्या केली असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या
नवी दिल्ली : निमलष्कर दलाच्या १५० पेक्षा जास्त जवानांनी २०१४ आणि या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत विविध कारणांनी आत्महत्या केली असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, इंडो- तिबेटियन सीमा पोलीस, सशस्त्र सीमा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि आसाम रायफल्सच्या १२० जवानांनी गेल्यावर्षी आत्महत्या केली. ३० एप्रिल २०१५ पर्यंत या संख्येत आणखी ३५ ची भर पडली.
यावर्षी मे महिन्यांतही आणखी आत्महत्यांची नोंद झाली असली तरी त्यासंबंधी डाटा अद्याप उपलब्ध झालेला नाही. कौटुंबिक कारणे, कामाचा ताण यांसह विविध कारणांमुळे जवानांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. जवानांसमोरील आव्हाने पाहता काही कल्याणकारी उपाययोजना हाती घेण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. (वृत्तसंस्था)