तीन तासांत जमले १५0 कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 04:43 AM2018-08-08T04:43:13+5:302018-08-08T04:43:39+5:30
मुला-मुलींसाठी वसतीगृहे बांधण्याचे या समाजाने ठरविले आणि त्यासाठी अवघ्या तीन तासांमध्ये १५0 कोटी रुपये जमा झाले.
अहमदाबाद : पाटीदार म्हणजे पटेल समाजाची कुलदेवी उमिया माता हिच्या भव्य मंदिरासह रुग्णालय, सांस्कृतिक व क्रीडा भलन, आरोग्य केंद्र तसेच मुला-मुलींसाठी वसतीगृहे बांधण्याचे या समाजाने ठरविले आणि त्यासाठी अवघ्या तीन तासांमध्ये १५0 कोटी रुपये जमा झाले!
या मंदिराच्या तयारीसाठी विश्व उमिया फाऊंडेशनने अहमदाबादमध्ये रविवारी सोहळा आयोजित केला होता. त्या सोहळ्यात मंदिरासाठी दान द्या असे आवाहन करण्यात आले. ज्यानंतर तीन तासांत १५0 कोटी रुपये जमा झाल्याचे वृत्त आहे. त्यापैकी ५१ कोटी रुपये तर मुंबईतील पटेल बंधूंनीच दिल्याचे सांगण्यात आले.
पाटीदार समाजाने मंदिरासह वरील सर्व सुविधा असलेले मोठे संकुल अहमदाबादेत उभारण्याचे ठरविले आहे. त्यासाठी १ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, २0१४ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्या सोहळ्यात १00 कोटी रुपयांसाठी आवाहन केले.
पण १५0 कोटी रुपये जमले, असे भाजपाचे नेते सी.के. पटेल यांनी सांगितले. मुंबईत राहणारे मंगल व नारायण पटेल यांनी ५१ कोटी रुपयांची देणगी दिली. (वृत्तसंस्था)