मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला 1500 किलोचा मासा, किंमत ऐकून व्हाल आश्चर्यचकित!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 09:43 PM2023-02-27T21:43:37+5:302023-02-27T21:44:16+5:30
सागौन मासा ही दुर्मिळ प्रजाती असून त्याचा उपयोग केवळ औषधे बनवण्यासाठी केला जात असल्याचे सांगण्यात येते.
आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांच्या एका पथकाने जवळपास 1500 किलो वजनाचा मासा पकडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एस. रायवरम मंडळाच्या पथकाने लावलेल्या जाळ्यात सुमारे 1500 किलो वजनाचा मोठा सागौन मासा पकडण्यात आला असून, सागौन मासा ही दुर्मिळ प्रजाती असून त्याचा उपयोग केवळ औषधे बनवण्यासाठी केला जात असल्याचे सांगण्यात येते.
या मोठ्या माशाची किंमत जवळपास तीन लाख रुपये असल्याचे येथील मच्छिमारांनी सांगितले. हा महाकाय सागौन मासा किनाऱ्यावर आणण्यासाठी मच्छीमारांना अतोनात प्रयत्न करावे लागले. यावेळी किनाऱ्यावर सागौन मासा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, या माशाचे वजन असूनही, मच्छिमारांनी ते परत किनाऱ्यावर आणण्यात यश मिळवले, जिथे त्यांनी ते जवळच्या भागातून जमलेल्या नागरिकांना अभिमानाने दाखवले.
1500 kg giant teak fish caught in fisherman's net in Anakapalli pic.twitter.com/hZntm9Svis
— Gaurav Lalit Sharma (@gaurav_lalit) February 27, 2023
याआधी विशाखापट्टणममध्ये पकडला होता महाकाय मासा
याआधी विशाखापट्टणममध्ये मच्छिमारांनी एक महाकाय मासा पकडला होता. हा मासा शार्क प्रजातीचा होता. त्याचे वजनही 1500 किलोच्या जवळपास होते. आणि त्याची लांबी सुमारे 13 फूट होती. मच्छिमारांच्या मते हा मासा खाऊ शकत नाही. दरम्यान, हा मासा किनाऱ्यावर आणण्यासाठी त्यांना तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागला होता. हा मासा मृतावस्थेत आढळले होता. त्यामुळे तो पुन्हा समुद्रात फेकण्यात आला.