1500 महिलांना फोनवरून सतावणाऱ्या विकृतास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2016 01:16 PM2016-07-07T13:16:01+5:302016-07-07T13:16:01+5:30

फोनवर अश्लील संभाषण किंवा मेसेज पाठवून 1500 महिलांना सतावणाऱ्या विकृत व्यक्तिला दिल्ली पोलीसांनी अटक केली आहे

1500 women arrested for disturbing the phone | 1500 महिलांना फोनवरून सतावणाऱ्या विकृतास अटक

1500 महिलांना फोनवरून सतावणाऱ्या विकृतास अटक

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - फोनवर अश्लील संभाषण किंवा मेसेज पाठवून 1500 महिलांना सतावणाऱ्या विकृत व्यक्तिला दिल्ली पोलीसांनी अटक केली आहे. मोहम्मद खालिद असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडे तीन सिम कार्ड आढळली, ज्यांच्या सहाय्याने तो देशभरातील 1500 महिलांना फोन करायचा, अश्लील संदेश पाठवायचा, अश्लील क्लिप्सही पाठवायचा आणि नंतर फोन स्विच ऑफ करायचा, ज्यामुळे त्याचा छडा लावणं शक्य होत नव्हतं.
एका आयटी एग्झिक्युटिव्हने तक्रार केल्यानंतर पोलीसांनी तपासाला सुरुवात केली आणि हा प्रकार उघडकीस आला. मोहम्मदच्या फोनमध्ये 2000 महिलांचे नंबर सेव्ह होते. गेल्या वर्षभरात त्याने 1500 महिलांना एकतर फोन करून किंवा मेसेज पाठवून त्रास दिल्याचे रेकॉर्ड्स वरून उघड झाले आहे. अशोक विहारमधल्या एका तरुणीने त्याचे कॉल रेकॉर्ड केले आणि ते कॉल व मेसेज पोलीसांना दाखवत तक्रार केली, ज्यानंतर पोलीसांनी कारवाई सुरू केली. 
पोलीसांनी नंबर ट्रेस केला तेव्हा तो बोगस नावाने घेतल्याचे लक्षात आले. नंतर एकदा खालिदने एका ओळखीच्या माणसाला जम्मू व काश्मिरमध्ये फोन केला आणि तो पोलीसांच्या जाळ्यात अडकला. त्या माणसाचा शोध घेण्यात आला, ज्याने खालिदचा पत्ता दिला. जुनी दिल्ली परीसरातील त्याच्या घरातून त्याला पोलीसांनी अटक केली आहे. 
बोगस कागदपत्रांच्या आधारे ही सीम कार्ड घेण्यात आली होती. तो जिथून कार्ड रिफिल करायचा त्या दुकानदारानेही खालिदला ओळखले. 
रोजच्या रोज खालिद 25 ते 30 महिलांना फोनवरून छळायचा. या महिलांना त्यांचे नंबर आणि फोटो फेसबुकवर टाकीन अशी धमकीही तो द्यायचा. लैंगिक छळाच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: 1500 women arrested for disturbing the phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.