हृदयद्रावक! 18 महिन्यांच्या बाळाला दुर्मिळ आजार; जीव वाचवण्यासाठी 17.5 कोटींचं इंजेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:15 PM2023-09-13T12:15:07+5:302023-09-13T12:15:33+5:30
18 महिन्यांच्या मुलाला दोन वर्षांहून अधिक काळ जगण्यासाठी इंजेक्शनच्या एका डोसची आवश्यकता होती. समस्या अशी होती की इंजेक्शनसाठी 17.5 कोटी रुपये खर्च होता. लोकांनी 10.5 कोटी रुपये जमा केले.
देशात काही कुटुंबं अशी आहेत की ज्यांना अनेक गंभीर आजारांवर उपचार मिळू शकलेले नाहीत. कारण आजकाल गंभीर आजारांवर उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. दिल्लीचा चिमुकला कनव जांगराची अशीच गोष्ट आहे. मुलाला दुर्मिळ आजार झाला आहे. या मुलाला 1.5 लाख लोकांनी मदत केली. 18 महिन्यांच्या मुलाला दोन वर्षांहून अधिक काळ जगण्यासाठी इंजेक्शनच्या एका डोसची आवश्यकता होती. समस्या अशी होती की इंजेक्शनसाठी 17.5 कोटी रुपये खर्च होता. लोकांनी 10.5 कोटी रुपये जमा केले.
18 महिन्यांचा कनव जांगरा स्पाइनल मस्कुलर एट्रोफी (SMA) टाईप 1 या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. सुमारे दीड लाख लोकांनी उपचारासाठी पैसे जमा केले. यासाठी त्याला Zolgensma इंजेक्शनची गरज आहे, ज्याची किंमत 17.5 कोटी रुपये आहे. दोन वर्षांहून अधिक काळ जगण्यासाठी हे इंजेक्शन आवश्यक होते. कनवचे वडील अमित जांगरा यांनी त्यांच्या मुलासाठी ऑनलाइन क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली जी व्हायरलही झाली. दिल्ली सरकार आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या मोहिमेत सहभागी होऊन मदतीचे आवाहन केले. अमेरिकन औषध निर्मात्याने 10.5 कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्याचे मान्य करून योगदान दिले.
कनव 7 महिन्यांचा असताना त्याला स्पाइनल मस्कुलर एट्रोफी (SMA) टाईप 1 चे निदान झाले. अशा परिस्थितीत जेव्हा मूल 2 वर्षांचं असते तेव्हा तो केवळ व्हेंटिलेटरच्या मदतीने जगू शकतो. असे असूनही, जगण्याची शक्यता फारच कमी आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की हा आजार जन्मापासूनच असतो, यामध्ये मूल बसू शकत नाही, चालू शकत नाही, तसेच तो अन्नही खाऊ शकत नाही. या आजारात मुलांना नीट श्वास घेता येत नाही.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी कनवच्या घरी जाऊन मुलाच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर मदत आणि इंजेक्शनने मुलाच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे समोर आले. मुलाचे हात आणि पाय सामान्यपणे काम करत आहेत. केजरीवाल म्हणाले की, संपूर्ण भारतात 9 लोक या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहेत. सोनू सूद, राजपाल यादव, फराह खान, विद्या बालन, शक्ती कपूर आणि कपिल शर्मा यांच्यासह अभिनेते आणि टीव्ही सेलिब्रिटींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलाच्या उपचारासाठी पैशाचे आवाहन केले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.