५,००० कोटी रुपये खर्च करुन १.५५ लाख टपाल कार्यालये होणार डिजिटल
By admin | Published: February 24, 2016 05:46 PM2016-02-24T17:46:30+5:302016-02-24T17:53:59+5:30
४,९०९ कोटी रुपये खर्च करुन देशातील १.५५ लाख टपाल कार्यालये डिजिटल माध्यमातून जोडली जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय दूरसंचार आणि माहिती-तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज लोकसभेत दिली
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - ४,९०९ कोटी रुपये खर्च करुन देशातील १.५५ लाख टपाल कार्यालये डिजिटल माध्यमातून जोडली जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय दूरसंचार आणि माहिती-तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज लोकसभेत दिली आहे. केंद्रीय दूरसंचारमंत्री प्रसाद म्हणाले, हा प्रकल्पाद्वारे टपाल विभागातील सर्व कामकाज एका मध्यवर्ती सर्व्हरशी जोडले जाईल त्यात एकात्मिक मॉड्यूलर आणि स्केलचा समावेश असेल.
ग्रामीण भागातील टपाल कार्यालये कोअर बॅंकिंग सेवेशी जोडली जाणार आहेत. शिवाय टपाल विभागाकडून येत्या तीन महिन्यांत एक हजार एटीएम केंद्र सुरू करून एटीएम सेवा पुरविली जाणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना दूरसंपर्काच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या अंतर्गत पोस्टमनजवळील सर्वच कामे डिजिटली होणार आहेत.
२२ फेब्रुवारी २०१६ नुसार, १७०५७ टपाल कार्यालये कोअर बॅंकिंग सेवेशी जोडली गेली आहेत. तर ८०५ मुख्य तसेच उप कार्यालये कोअर बॅंकिंग सेवेशी जोडली गेली आहेत. या सेवेअंतर्गत ५१० एटीमचा वापर केला जातो अशी माहीती प्रसाद यांनी लोकसभेतील प्रश्न-उत्तराच्या तासात दिली.