दक्षिण सुदामधून 156 भारतीयांना केलं 'एअरलिफ्ट'

By admin | Published: July 15, 2016 02:57 PM2016-07-15T14:57:46+5:302016-07-15T15:09:37+5:30

दक्षिण सुदानमधील युद्दामुळे अडकलेलेया भारतीयांची सुटका करण्यासाठी ‘ऑपरेशन संकटमोचन’ सुरु करण्यात आलं असून पहिल्या टप्प्यात 156 भारतीयांची सुटका करण्यात आली

156 Indians made 'Airlift' from South Suda | दक्षिण सुदामधून 156 भारतीयांना केलं 'एअरलिफ्ट'

दक्षिण सुदामधून 156 भारतीयांना केलं 'एअरलिफ्ट'

Next
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 15 - दक्षिण सुदानमधे अडकलेल्या 156 भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. 156 भारतीयांना घेऊन निघालेलं हवाईदलाचं C-17 विमान शुक्रवारी पहाटे पाच वाजता तिरुअनंतपुरममध्ये दाखल झालं. तिथून सकाळी 10 वाजता ते दिल्लीला पोहोचलं. दक्षिण सुदानमधील युद्दामुळे अडकलेलेया भारतीयांची सुटका करण्यासाठी ‘ऑपरेशन संकटमोचन’ सुरु करण्यात आलं आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात 156 भारतीयांची सुटका करण्यात आली. पराराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही के सिंह यांनी ऑपरेशन संकटमोचनचं नेतृत्त्व केलं.
 
दक्षिण सुदानमधील यादवीला पुन्हा तोंड फुटल्यामुळे देशाची राजधानी जुबात 300 हून अधिक भारतीय अडकून पडले आहेत. वांशिक आधारावर फूट पडलेल्या दोन सशस्त्र गटांत गुरुवारपासून लढाई सुरू असून, भारतीयांनी भारतीय दूतावासासह विविध ठिकाणी आश्रय घेतला आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या गटातील संघर्षामुळे सुदानला अंतर्गत यादवीने पछाडलं आहे. यामध्ये 200 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राष्ट्रपतींनी सोमवारीच युद्धविरामची घोषणा केली होती.
 
दक्षिण सुदानमधील गृहयुद्धात 600 भारतीय अडकले आहेत. त्यापैकी 450 जण राजधानी जुबामध्ये आहेत. मात्र या 600 पैकी केवळ 300 भारतीयांना मायदेशात परतण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार 156 नागरिक हवाईदलाच्या  विमानाने परतले आहेत.
 

Web Title: 156 Indians made 'Airlift' from South Suda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.