धक्कादायक! बिहारमध्ये 156 विद्यार्थ्यांना फूड पॉइजनिंग; जेवणानंतर पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 04:32 PM2022-03-24T16:32:09+5:302022-03-24T16:34:21+5:30

156 Students Hospitalised After Lunch : बिहार दिवसाच्या उत्सवादरम्यान दुपारचे जेवण केल्यावर पोटदुखी आणि उलट्या होत असल्याची तक्रार केली होती. 

156 students hospitalised after having lunch during bihar diwas celebrations in patna | धक्कादायक! बिहारमध्ये 156 विद्यार्थ्यांना फूड पॉइजनिंग; जेवणानंतर पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास

धक्कादायक! बिहारमध्ये 156 विद्यार्थ्यांना फूड पॉइजनिंग; जेवणानंतर पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास

googlenewsNext

नवी दिल्ली - बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बिहार दिवस साजरा करणं शालेय विद्यार्थ्यांना चांगलंच महागात पडलं आहे. तब्बल 156 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,  बिहारमध्ये 150 हून अधिक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी बिहार दिवसाच्या उत्सवादरम्यान दुपारचे जेवण केल्यावर पोटदुखी आणि उलट्या होत असल्याची तक्रार केली होती. 

पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 156 विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळत आहे. मुलांना फूड पॉइजनिंग झाल्याचं म्हटलं आहे. जेवल्यानंतर मुलांना कसं तरी होऊ लागलं, पोटदुखी आणि भीती वाटू लागली. मोठ्या उत्साहात बिहार दिवस साजरा करण्यात आला. पाटणाच्या गांधी मैदानातील या कार्यक्रमाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हजेरी लावली होती. 

राज्यभरातून शालेय विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. बिहार दिनानिमित्त दुपारचे जेवण केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे 156 हून अधिक विद्यार्थ्यांनी उपचारासाठी नोंदणी केली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी बहुतेकांनी पोटदुखी आणि उलट्या झाल्याची तक्रार केली, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विभा सिंह यांनी दिली.

सर्व विद्यार्थ्यांवर योग्य उपचार केले जात आहेत. अन्नातून हे झाल्याचं सध्या आम्ही गृहीत धरलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक समितीही स्थापन केली आहे, असंही विभा सिंह यांनी म्हटलं आहे. पालकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: 156 students hospitalised after having lunch during bihar diwas celebrations in patna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.