दहा तान्ह्या बाळांसह १६ मुलांचा यूपीत मृत्यू ,गोरखपूर हॉस्पिटल; वर्षभरात ३१0 दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 01:11 AM2017-10-10T01:11:12+5:302017-10-10T01:11:32+5:30
गोरखपूरच्या बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासांत दहा तान्हा बाळांसह १६ मुलांचा मृत्यू झाला़ दहा जणांना नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते तर सहा जणांना मुलांसाठीच्या
लखनौ : गोरखपूरच्या बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासांत दहा तान्हा बाळांसह १६ मुलांचा मृत्यू झाला़ दहा जणांना नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते तर सहा जणांना मुलांसाठीच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.
२० रुग्ण हे (सहा देवरियाचे, दोन कुशीनगरचे, गोरखपूर व महाराजगंजचे प्रत्येकी चार आणि बस्ती व बलरामपूरचा प्रत्येकी एकेक) मेंदूला आलेल्या सूजेनंतर गेल्या २४ तासांत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ३६ रुग्णांवर (त्यातील बहुतेक हे मेंदूला सूज आलेले आहेत) बाबा राघव दास महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. पाच रुग्ण बिहारचेही आहेत.
अधिकाºयांनी सांगितले की, १,४७० रुग्ण या वर्षी जानेवारीपासून या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील ३१० जणांचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. बीआरडी वैद्यकीय महाविद्यालय गेल्या आॅगस्टमध्ये तान्ह्या बाळांसह ६३ मुलांचा मृत्यू अवघ्या एका आठवड्यात झाल्यामुळे चर्चेत आले होते. आॅक्सिजन सिलिंडरचा पुरवठा विक्रेत्याने बिलाअभावी थांबवल्यामुळे हे मृत्यू झाले होते.
उशिरा दाखल केले-
डॉक्टर म्हणाले की, आता मुलांचे मृत्यू हे आॅक्सिजनच्या टंचाईमुळे, उपचारांअभावी किंवा इतर कोणत्याही कारणाने झालेले नाहीत. त्यांची प्रकृती खूप गंभीर झाल्यावर त्यांना रुग्णालयात आणण्यात आल्याने ते
दगावले आहेत.
आॅगस्टमधील मृत्यूनंतर या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पदावरून दूर करण्यात आले होते व घटनेच्या चौकशीचे आदेश दिले गेले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाल्यावर ते म्हणाले होते की, हे राज्य १९७० पासून मेंदूला सूज येण्याच्या आजाराला तोंड
देत आहे.