खान्देश पीपल्स् पतसंस्थेत नियमबाह्य कर्जवाटप १६ लाखांचा अपहार : चेअरमन, संचालकांसह कर्जदारांवर गुन्हा

By admin | Published: August 1, 2016 11:56 PM2016-08-01T23:56:54+5:302016-08-01T23:56:54+5:30

जळगाव : सावदा येथील खान्देश पीपल्स् नागरी सहकारी पतसंस्थेत नियमबा‘ व विनातारण कर्जवाटप करीत १६ लाख ७ हजार ५६३ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन चेअरमन, संचालक व कर्जदार अशा ३४ जणांविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

16 lakhs of out-of-the-box loan disbursed in Khandesh Peoples Credit Society: Guilty of borrowers, including Chairman, Directors | खान्देश पीपल्स् पतसंस्थेत नियमबाह्य कर्जवाटप १६ लाखांचा अपहार : चेअरमन, संचालकांसह कर्जदारांवर गुन्हा

खान्देश पीपल्स् पतसंस्थेत नियमबाह्य कर्जवाटप १६ लाखांचा अपहार : चेअरमन, संचालकांसह कर्जदारांवर गुन्हा

Next
गाव : सावदा येथील खान्देश पीपल्स् नागरी सहकारी पतसंस्थेत नियमबा‘ व विनातारण कर्जवाटप करीत १६ लाख ७ हजार ५६३ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन चेअरमन, संचालक व कर्जदार अशा ३४ जणांविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावदा येथील खान्देश पीपल्स् नागरी सहकारी पतसंस्थेत कर्जदारांनी संस्थेकडून कर्जाची उचल करीत असताना मालमत्ता तारण दिली नसल्याचे आढळून आले. तसेच संस्थेची कर्जवितरण मर्यादा ही ५० हजार असताना प्रत्यक्षात जास्त कर्जवाटप केल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हा विशेष लेखापरिक्षक पी.एफ.चव्हाण यांनी या प्रकरणी जिल्हा सरकारी वकिलांचा अभिप्राय मागविला होता. अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर चव्हाण यांनी लेखापरिक्षक प्रमोद देवीदास पाटील यांना सावदा पोलिसात फिर्याद देण्याचे आदेश दिले होते. खान्देश पीपल्स् नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारातील रकमेसाठी १९ कर्जदार व तत्कालीन संचालक मंडळाचे सदस्य तसेच व्यवस्थापक अशा ३५ जण जबाबदार असल्याचे आढळून आले. चेअरमन, संचालक व कर्जदार यांनी संगनमत करीत ठेवीदारांकडून स्विकारलेल्या ठेवीची रक्कम विनातारण व मर्यादेपेक्षा जास्त कर्ज वाटप करीत १६ लाख ७ हजार ५६३ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सातव करीत आहेत.

Web Title: 16 lakhs of out-of-the-box loan disbursed in Khandesh Peoples Credit Society: Guilty of borrowers, including Chairman, Directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.