१६ वाळू गटांतून १६ कोटींची महसूल वाळू गट लिलाव : हनुमंतखेडे सिमला सर्वाधिक सव्वा दोन कोटी

By Admin | Published: December 23, 2015 12:17 AM2015-12-23T00:17:20+5:302015-12-23T00:17:20+5:30

जळगाव : जिल्हा प्रशासानातर्फे गिरणा, तापी यासह विविध नदी पात्रातील ४४ वाळू गटांमधून गटनिहाय वाळू लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या १६ वाळू गटांच्या निविदा २२ रोजी उघडण्यात आली. या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला १५ कोटी ८९ लाख ४६ हजार ५०६ रुपयांचा महसूल मिळाला आहे. सर्वाधिक रक्कम ही एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडे सिम भाग १ या गटाला मिळाली आहे.

16 million revenue earning revenue of 16 crores by sand group auction: Hanumantkhed Shimla gets highest amount of 2 crores | १६ वाळू गटांतून १६ कोटींची महसूल वाळू गट लिलाव : हनुमंतखेडे सिमला सर्वाधिक सव्वा दोन कोटी

१६ वाळू गटांतून १६ कोटींची महसूल वाळू गट लिलाव : हनुमंतखेडे सिमला सर्वाधिक सव्वा दोन कोटी

googlenewsNext
गाव : जिल्हा प्रशासानातर्फे गिरणा, तापी यासह विविध नदी पात्रातील ४४ वाळू गटांमधून गटनिहाय वाळू लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या १६ वाळू गटांच्या निविदा २२ रोजी उघडण्यात आली. या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला १५ कोटी ८९ लाख ४६ हजार ५०६ रुपयांचा महसूल मिळाला आहे. सर्वाधिक रक्कम ही एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडे सिम भाग १ या गटाला मिळाली आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे ४४ वाळू गटांसाठी ई-लिलाव करण्यात आला. त्यात सोमवार २१ रोजी ई-लिलाव करण्यात आला. यात १६ गटांसाठी निविदा प्राप्त झाल्या होत्या. या निविदा मंगळवारी उघडण्यात आल्या.
चोपडा तालुक्यात सर्वाधिक रक्कम
चोपडा तालुक्यातील धुपे खुर्द, घाडवेल, वाळकी शेंदणी, मालखेडा, तांदलवाडी भाग एक, पिंप्री सहा गटांसाठी निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यात सर्वाधिक सहा कोटी ८७ लाख ८ हजार २०० रुपयांची रक्कम मिळाली आहे.
हनुमंतखेडे व धानोरा बुद्रुकला सर्वाधिक बोली
वाळू गटांच्या ई-निविदेत सर्वाधिक रक्कम ही एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडे सीम भाग एक या गटासाठी मिळाली. या गटासाठी सुनील मंत्री यांनी दोन कोटी २७ लाख ६५ हजार ५०० रुपयांची निविदा भरली होती. त्यापाठोपाठ जळगाव तालुक्यातील धानोरा बुद्रुक भाग दोन या गटासाठी कुंजल कन्स्ट्रक्शनने दोन कोटी दोन लाख १७ हजार २०८ रुपयांची निविदा भरली होती.
कुवारखेडा गटासाठी हरकत
ई-ऑक्शन दरम्यान कुवारखेडा गटासाठी एक कोटीच्या ऐवजी दहा कोटीची रक्कम टाकल्याचा प्रकार सोमवारी झाला होता. या गटासाठी सुधारित एक कोटीची रक्कम टाकून मुदत देण्यात आली होती. त्यानंतर हा ठेका एक कोटी ६१ लाख ५० हजार ३५० रुपयांना गेला होता. समोरच्या निविदाधारकाला मुदत दिली त्यावेळी आपल्याला बदलाबाबत न कळविल्याने या ठेक्याच्या लिलावाला सुनील मंत्री यांनी आक्षेप घेतला आहे. त्या आशयाचे पत्र त्यांनी अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांना दिले आहे.

Web Title: 16 million revenue earning revenue of 16 crores by sand group auction: Hanumantkhed Shimla gets highest amount of 2 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.