जाता जाता चिमुकला दोघांना जीवदान देऊन गेला; पालकांनी घेतला मोठा निर्णय...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 07:34 PM2022-08-25T19:34:15+5:302022-08-25T19:34:24+5:30
रिशांत भलेही त्याच्या शरीरात नसेल, पण त्याचे ह्रदय दुसऱ्या चिमुकल्याच्या शरीरात धडकेल.
दिल्लीतीलएम्स रुग्णालयातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. खेळता-खेळता पडलेल्या एका चिमुकल्याला या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान त्या 16 महिन्यांच्या रिशांतचा मृत्यू झाला. तो आता या जगात नसेल, पण जाता-जाता त्याने दोघांना जीवदान दिले आहे. रिशांतच्या पालकांनी अतिशय जड अंत:करणाने अवयवदानाला परवानगी दिली आहे.
उपचारादरम्यान मृत्यू
जमुना पार्कमध्ये राहणाऱ्या उपेंद्रने सांगितले की, 17 ऑगस्ट रोजी खेळता-खेळता रिशांत(16 महिने) पडला होता. यात त्याला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथून डॉक्टरांनी 17 ऑगस्ट रोजी त्याला दिल्लीच्या जयप्रकाश नारायण एपिक्स ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर केले. तब्येत आणखी बिघडल्यामुळे त्याला एम्समध्ये आणण्यात आले. पण, उपचारादरम्यान 24 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला.
डॉक्टरांनी केले समुपदेशन
रिशांतच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी त्याचे वडील उपेंद्र आणि इतर नातेवाईकांचे समुपदेशन केले. त्यांना अवयवदानाची रीतसर माहिती देण्यात आली. रिशांततचे शरीर नसले तरी त्याचे अवयव दोन जणांना जीवदान देणार असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांच्या सांगण्यावरून वडील उपेंद्र यांनी अवयवदानाला मंजुरी दिली आहे. आता रिशांतचे ह्रदय दुसऱ्या एखाद्या चिमुकल्याच्या शरीरात धडकेल.