आयकर विभागाच्या छापेमारीत कर्नाटकाच्या दोन नेत्यांकडे 162 कोटींचे घबाड
By admin | Published: January 24, 2017 10:40 AM2017-01-24T10:40:13+5:302017-01-24T12:07:48+5:30
कर्नाटकातील एक मंत्री आणि प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षांच्या घरी आयकर विभागाने टाकलेल्या छाफ्यात 162 कोटी रुपयांपेक्षा अधिक अघोषित संपत्ती जप्त केली आहे
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 24 - कर्नाटकातील एक मंत्री आणि प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षांच्या घरी आयकर विभागाने टाकलेल्या छापेमारीत 162 कोटी रुपयांपेक्षा अधिक अघोषित संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या छाप्यामध्ये 41 लाख रुपये रोख रक्कम त्याचप्रमाणे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही नेत्यांवर साखर उद्योग व सहकारी सोसायट्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काळा पैसा जमवल्याचा आरोप आहे.
आयकर विभागाच्या एका आधिकाऱ्याने सांगितले, गेल्या आठवड्यात गोकाक आणि बेळगाव येथे मंत्री रमेश जारखिहोली आणि काँग्रसेच्या महिलाप्रदेश अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मालमत्तेवर छापा मारला होता. यावेळी अघोषित संपत्ती बरोबरच स्पष्टीकरण देता न आलेल्या गुंतवणुकीबाबत माहिती मिळाली.
आयकर विभागाकडून 4 हजार 200 कोटींची 'डर्टी कॅश' जप्त
उमेदवारावर आयकर विभागाचाही ‘वॉच’ !
शाहरुख खानकडे काळा पैसा ? परदेशातील संपत्तीसंबंधी आयकर विभागाची नोटीस
आपण काही चुकीचे केले नसून माझ्या घरी व कार्यालयावर आयकर विभागाचे छापे मारणे म्हणजे राजकीय कटाचा भाग असल्याचा आरोप आयकर विभागाच्या छापेमारीनंतर मंत्री रमेश जारखिहोली यांनी केला. आयकर अधिकारी आमच्या बेळगावी येथील घरी आले होते. त्यांना आम्ही योग्य ते सहकार्य केले होते. भविष्यातही आम्ही आयकर अधिकाऱ्यांना सहकार्य करू असे ते म्हणाले. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.