१७ मशिदींमधून सामायिक अजान!
By admin | Published: June 16, 2017 03:43 AM2017-06-16T03:43:56+5:302017-06-16T03:43:56+5:30
स्थानिक लोकांना त्रास होऊ नये आणि ध्वनिप्रदूषणही कमी व्हावे यासाठी मलप्पुरम जिल्ह्यातील वझक्कड शहर आणि त्याच्या परिसरात असलेल्या एकूण १७ मशिदींनी
मलप्पुरम (केरळ) : स्थानिक लोकांना त्रास होऊ नये आणि ध्वनिप्रदूषणही कमी व्हावे यासाठी मलप्पुरम जिल्ह्यातील वझक्कड शहर आणि त्याच्या परिसरात असलेल्या एकूण १७ मशिदींनी पाच नमाजांच्या वेळी लाऊडस्पीकरवरून स्वतंत्र अजान न देता दिवसातून फक्त एकदाच सामायिक अजान देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.
सुन्नी, मुजाहिद (सलाफी), जमाते इस्लामी व तब्लिगे जमात इत्यादी मुस्लिमांमधील विविध शाखांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत यासंबंधी रीतसर समझोता करण्यात आला व गेला आठवडाभर त्याचे पालन सुरू आहे.
त्यानुसार वलिया जुम्मा मशीद या सर्वांत मोठ्या मशिदीतून दिवसातील एकाच प्रमुख नमाजाची अजान लाऊडस्पीकरवरून देण्यात येते व इतर मशिदी त्याच वेळी त्याच अजानचा लाऊडस्पीकर न
लावता पुनरुच्चार करतात. त्यामुळे सुमारे ५ किमी परिसरात १७ मशिदी असूनही दिवसातून फक्त एकच अजान सर्वांना ऐकू जाईल अशी मोठ्या आवाजात दिली जाते, असे वझक्कड मशिद समितीचे अध्यक्ष टी. पी. अब्दुल अझीज यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)