कॅनडाच्या संसदेत १७ भारतीय; १६ जण पंजाबी, भारतीय नेता किंगमेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 06:57 AM2021-09-23T06:57:27+5:302021-09-23T07:01:05+5:30

लिबरल पार्टीला सर्वाधिक जागा; अंजू धिल्लाँ दुसऱ्यांदा विजयी 

17 Indians in the Parliament of Canada; 16 Punjabis, 6 women among the winners | कॅनडाच्या संसदेत १७ भारतीय; १६ जण पंजाबी, भारतीय नेता किंगमेकर

कॅनडाच्या संसदेत १७ भारतीय; १६ जण पंजाबी, भारतीय नेता किंगमेकर

Next

बलवंत तक्षक -

चंदीगड :कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्स (संसद)च्या निवडणुकीत १७ भारतीय निवडून आले असून, त्यात १६ जण मूळचे पंजाबचे आहेत. तसेच विजयी झालेल्या भारतीयात ६ महिला आहेत. (17 Indians in the Parliament of Canada; 16 Punjabis, 6 women among the winners)

विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये न्यू डेमॉक्रेटिक पार्टीचे प्रमुख नेते जगमित सिंग तसेच संरक्षणमंत्री हरजित सिंग सज्जन यांचा समावेश आहे. ज्या भारतीय महिला संसदेवर निवडून आल्या आहेत, त्यात अनिता आनंद, अंजू धिल्लाँ, सोनिया सिद्धू, रुबी सहोता, बर्दिश चग्गर यांचा समावेश आहे. अंजू धिल्लाँ सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. 

 निवडून आलेले एकमेव बिगरपंजाबी नेते चंद्रकांत आर्य हे मूळचे कर्नाटकातील असून, ते लिबरल पार्टीचे आहेत. गेल्या वेळी कॅनडाच्या संसदेवर २० भारतीय विजयी झाले होते. यंदा ही संख्या तीनने कमी झाली. 

भारतीय नेता किंगमेकर
यंदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र लिबरल पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या असून, जस्टिन त्रुदो यांच्या गळ्यात पंतप्रधानपद आले आहे. त्यांना जगमित सिंग यांच्या न्यू डेमॉक्रेटिक पार्टीने पाठिंबा दिल्याने हे शक्य झाले आहे. त्यामुळे ते किंगमेकर म्हणून ओळखले जात आहेत.
 

Web Title: 17 Indians in the Parliament of Canada; 16 Punjabis, 6 women among the winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.