मोठी दुर्घटना ! खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात, 17 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 12:03 AM2021-06-09T00:03:26+5:302021-06-09T00:04:19+5:30

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत, अपघातातील मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये आर्थिक मदत घोषित केली आहे.

17 killed in private bus and tempo accident in kanpur accident | मोठी दुर्घटना ! खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात, 17 जणांचा मृत्यू

मोठी दुर्घटना ! खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात, 17 जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देखासगी शताब्दी बस आणि टेम्पोमध्ये जोराची धडक बसली. त्यामुळे, बसमधील प्रवाशी गाडीच्या आतमध्ये चेंबले गेले.

कानपूर - उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे भीषण अपघात होवून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. एका खासगी प्रवाशी बसचा आणि टॅम्पोची समोरासमोर धडक बसल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटेत 17 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. 


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत, अपघातातील मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये आर्थिक मदत घोषित केली आहे. तसेच, गृहमंत्री अमित शहा यांनीही शोक व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, मृतांच्या वारसांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे, तसेच जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.   

खासगी शताब्दी बस आणि टेम्पोमध्ये जोराची धडक बसली. त्यामुळे, बसमधील प्रवाशी गाडीच्या आतमध्ये चेंबले गेले. अद्यापही मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरूच होते. कानपूरचे आयजी मोहित अग्रवाल यांनीही घटनेची माहिती देताना, 17 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. 
 

Web Title: 17 killed in private bus and tempo accident in kanpur accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.