रुग्णालयाने आकारले १७ लाखांचे बिल!, मुलाने केली पोलीस तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 05:27 AM2018-02-23T05:27:36+5:302018-02-23T05:27:41+5:30
शस्त्रक्रियेतील हेळसांडीमुळे आईचा मृत्यू झाल्याचा आरोप करणारी तक्रार एकाने पोलिसांकडे केली आहे
गुरगाव : शस्त्रक्रियेतील हेळसांडीमुळे आईचा मृत्यू झाल्याचा आरोप करणारी तक्रार एकाने पोलिसांकडे केली आहे. या शस्त्रक्रियेसाठी येथील खासगी रुग्णालयाने १७ लाख रुपयांचे बिल त्याला आकारले आहे. गेल्या महिन्यात शस्त्रक्रियेनंतर १८ दिवसांनी महिलेचा मृत्यू झाला.
पोलिसांनी तक्रार घेतली असली तरी गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय आरोग्य विभागाकडून चौकशी होऊन त्याचा अहवाल आल्यावरच होणार आहे. सावित्री देवी या मूळच्या अलवार (राजस्थान) येथील. त्यांना ८ जानेवारी रोजी येथील कोलंबिया एशिया रुग्णालयात दाखल केले गेले. माझ्या आईच्या पित्ताशयातील खडे काढण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक होती, असा दावा त्यांचा मुलगा राजेंद्र सिंह याने केला. दुसºया दिवशी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. रुग्णालयाने मात्र आम्ही अशी कोणतीही शस्त्रक्रिया केली नाही, असे म्हटले. कोलंबिया एशियाचे महाव्यवस्थापक डॉ. चैतन्य पठाणिया म्हणाले की, सावित्री देवी यांच्यावर आॅगस्ट २०१७मध्ये दुसºया रुग्णालयात पित्ताशयातील खडे काढण्यासाठी शस्त्रक्रिया झाली होती. तेथे खडे काढण्यातही आले. आमच्या रुग्णालयात त्यांना सामान्य पित्त नलिकेतील खडे काढण्यासाठी दाखल केले होते. माझ्या आईला ९ जानेवारी रोजी शस्त्रक्रियेनंतर पोटात वेदना झाल्या. आणखी तपासण्या केल्यावर तिच्या आतड्यांची हानी झाल्याचे उघड झाले, असा आरोप राजेंद्र सिंह यांनी केला. त्यानंतर रुग्णालयाने सावित्री देवी यांच्यावर आणखी तीन शस्त्रक्रिया केल्या व त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले. सावित्री देवी यांचा २६ जानेवारी रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला.
राजेंद्र सिंह याने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत रुग्णालयाने उपचारांसाठी
१७ लाख रुपये बिल आकारल्याचा आरोप केला. आम्हाला तक्रार मिळाली असून, ती मुख्य वैद्यकीय अधिकाºयांकडे पाठवली आहे. आम्हाला आरोग्य विभागाकडून अहवाल मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय होईल, असे पालम विहार पोलीस ठाण्याच्या अधिकाºयाने सांगितले.