उत्तर प्रदेशात १७ मनपा भाजपच्या ताब्यात; नगरपालिका व नगर पंचायतींमध्येही मोठे यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 09:14 AM2023-05-14T09:14:03+5:302023-05-14T09:14:28+5:30
योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोझरने सर्व विरोधकांना नामोहरम करून सर्व १७ महापालिकांवर ताबा मिळवला आहे. भाजपचे सर्व १७ महापौर विजयी झाले आहेत.
संजय शर्मा -
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचा अभूतपूर्व विजय झाला आहे. सर्व १७ महापालिका भाजपच्या ताब्यात गेल्या व नगरपालिका, नगरपंचायतीमध्येही भाजपने मोठा विजय प्राप्त केला आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोझरने सर्व विरोधकांना नामोहरम करून सर्व १७ महापालिकांवर ताबा मिळवला आहे. भाजपचे सर्व १७ महापौर विजयी झाले आहेत.
यापूर्वी २०१८ मध्ये भाजपने १७ पैकी १४ महापालिकांवर विजय मिळवला होता. भाजपचा हा विजय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जादुई करिश्म्याशी जोडून पाहिला जात आहे. यूपीमध्ये ज्या पद्धतीने योगींनी गुंड, माफियांच्या विरोधात मोहीम चालवली, त्यांच्या ताब्यातील अवैध मालमत्तांवर बुलडोझर चालवला.
सेमी फायनल जिंकली... -
या निवडणुकांना उत्तर प्रदेशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधीची सेमी फायनल म्हटले जात आहे. यात भाजपने १०० टक्के महापौरपदे ताब्यात घेऊन संकेत दिले आहेत की, २०२४ मध्ये यूपीमध्ये लोकसभेच्या सर्वच्या सर्व ८० जागा जिंकण्याची पूर्ण तयारी आहे.
राज्यात मतमोजणी सुरू असून, १७ महापालिका भाजपने जिंकल्या आहेत. नगरपालिका अध्यक्षांच्या निवडणुकीत भाजपने १९९ पैकी ९९ पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला होता. अनेक ठिकाणी मतमोजणी सुरू होती.