उत्तर प्रदेशमध्ये यमुना नदीत बोट उलटून 19 जणांचा मृत्यू, बोटीमध्ये होते 60 प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 09:37 AM2017-09-14T09:37:48+5:302017-09-14T10:40:14+5:30
उत्तरप्रदेशच्या बागपतमध्ये यमुना नदीत बोट उलटून 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
लखनऊ, दि. 14 - उत्तरप्रदेशच्या बागपतमध्ये यमुना नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जणांना वाचविण्यात यश आलं असून त्यांना सध्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या बोटीमध्ये 60 प्रवासी प्रवास करत होते.
Baghpat (UP): 6 people dead after a boat carrying over 24 people capsized in river Yamuna; police on the spot, rescue operation underway pic.twitter.com/VzMUivcdSL
— ANI UP (@ANINewsUP) September 14, 2017
बागपत शहराजवळील काठा गावातील ग्रामस्थांची शेती यमुनेजवळ आहे. काही ग्रामस्थ गुरूवारी सकाळी यमुना नदीतून बोटीतून शेतावर जात होते. या बोटीत जवळपास ६० जण होते, असे सांगण्यात येत आहे. यमुना नदीत ही बोट बुडाली. यात १9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. १२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
#UPDATE 15 people dead, 12 people rescued and admitted to hospital after a boat carrying 60 people capsized in river Yamuna in Baghpat
— ANI UP (@ANINewsUP) September 14, 2017
बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात येत आहे. बोटीतून क्षमतेहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे ही दुर्घटना घडली. ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासनाने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्यात येत आहे, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.