Atiq Ahmed, Ashraf Shot Dead : अतीकच्या सुरक्षेत तैनात 17 पोलीस कर्मचारी निलंबित, CM योगींच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 01:37 AM2023-04-16T01:37:44+5:302023-04-16T01:53:37+5:30
अतीक अहमद आणि अश्रफच्या हत्येनंतर, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या 17 पोलील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याच बरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची शनिवारी रात्री तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. येथील मेडिकल कॉलेजबाहेर हा संपूर्ण थरार घडला. विशेष म्हणजे, या दोघांना पोलीस बंदोबस्तात मेडिकलसाठी नेत असतानाच हा हल्ला झाला. यानंतर आता, अतीक अहमद आणि अश्रफच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात 17 पोलील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
17 पोलील कर्मचाऱ्यांना करण्यात आले निलंबित -
अतीक अहमद आणि अश्रफच्या हत्येनंतर, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या 17 पोलील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याच बरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. याशिवाय, अतिक आणि अश्रफच्या हत्येनंतर, प्रयागराजमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने कलम 144 लागू करण्यात आले आहे. याच बरोबर परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
तीन जणांनी झाडल्या गोळ्या -
प्रयागराजमधील मेडिकल कॉलेजबाहेर तीन जणांनी जय श्री राम, अशा घोषणा देत अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफवर गोळ्या झाडल्या. यानंतर या तिघांनीही तत्काळ आत्मसमर्पणही केले आहे. यापूर्वी 13 एप्रिलला झांसी जिल्ह्यातील परीछा डॅम भागात अतीकचा मुलगा असद आणि मुहम्मद गुलाम यांचा पोलीस एनकाउंटरमध्ये मृत्यू झाला होता. आजच अतीक अहमदचा मुलगा असदचा पोलीस बंदोबस्तात कसारी-मसारी कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला होता.
4 जणांचं एनकाउंटर, 3 जणांचा शोध सुरू -
उमेश पाल हत्याकांडात पोलीस अतीक अहमदचा मुलगा असद, अरमान, गुलाम, गुड्डू मुस्लिम आणि साबिर यांच्या शोधात होते. यांच्यावर 5-5 लाख रुपयांचे बक्षिसही घोषित करण्यात आले होते. पोलिसांनी असद आणि गुलाम यांचे एनकाउंटर केले. तीन शूटर अरमान, गुड्डू मुस्लिम आणि साबिर यांचा शोध सुरू आहे. यापूर्वी पोलिसांनी दोन शूटर अरबाज आणि विजय चौधरी उर्फ उस्मान यांचे एनकाउंटर केले होते.