१७ जवान शहिद तर चार पाकिस्तानी दहशतवादी यमसदनी
By admin | Published: September 18, 2016 08:04 AM2016-09-18T08:04:38+5:302016-09-18T13:11:24+5:30
बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावरील दहशतवादयाच्या हल्लात १७ जवान शहीद झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
काश्मीर, दि. १८ : बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावरील दहशतवाद्याच्या हल्लात १७ जवान शहीद झाले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय जवानांना यश आले आहे. मारले गेलेले दहशतवादी पाकिस्तानचे असल्याचे समजते. लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयाच्या जवळ सैनाकांनी घेराव घातला आहे. लष्काराच्या मदतीसाठी पॅराकंमाडोंना पाचारण करण्यात आलं होतं.
बारामुल्ला येथील सीमेला लागून असलेल्या भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर दहशतवादयांने आत्मघातकी हल्ला केला. लष्कराचे उरी येथील ब्रिगेड मुख्यालय भारत-पाक सीमेला लागून आहे. पहाटे साडे पाच वाजता दहशतवाद्यांने हा भीषण हल्ला केल्याची माहीती पोलिसांनी दिली. पहाटे झालेल्या गोळाबार आणि स्फोटाच्या आवाजानंतर जवानांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. घटनास्थाळावर मदतीसाठी जवानांचे स्पेशल पथक पाठवण्यात आले आहे.
चार दहशतवादी मुख्यालयात घुसले होते. दहशतवादयांनी मुख्यालयाच्या आत प्रवेश केल्यावर दोन - दोनच्या गटात वेगळे झाले आणि त्यांनी मुख्यालयावर अंधाधूंद गोळीबार केला. भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रतिउत्तर देताना चारही दहशताद्यांना कंठस्थान घातले आहे. यमसदनी पाठवलेले चारही दहशतवादी पाकिस्थानातील असल्याचे वृत्त समोर आले आहे. उरीमधील बाराव्या ब्रिगेडचं मुख्यालय एलओसीपासून नजीक आहे. हीच संधी साधून आत्मघाती हल्लेखोरांनी मुख्यालय वेठीस धरले आहे.
या हल्याचे गांभीर्य पाहत गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आपला पुर्वनियोजित परदेश दौरा रद्द पुढे ढकलला आहे. ते रुस आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार होते. गृहमंत्र्यांनी याबाबत दुपारी १२.३० वाजाता आपल्या निवस्थानावर एक विशेष बैठक बोलवली आहे. तर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर घटनास्थाळला भेट देणार आहेत.
यापुर्वीही दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात अनेकवेळा लष्करावर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. लष्कराने वेळोवेळी त्यांना चोख प्रत्यूत्तर देत दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलेले आहे.