Video: 17.5 कोटींचं इंजेक्शन; चिमुकल्या कनवची CM केजरीवालांनी घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 06:21 PM2023-09-12T18:21:39+5:302023-09-12T18:23:47+5:30
लहानग्या कनवला जीवघेणा आजार जडला असून त्याच्यावरील उपचारा खर्च तब्बल १७.५ कोटी रुपये एवढा आहे.
नवी दिल्ली - दिल्लीचेमुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल हे जनतेप्रती असलेल्या संवेदनशील आणि उपक्रमशील कार्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. दिल्लीच्या जनतेला सरकारकडून सर्वाधिक फायदा देण्याचा आणि त्याचा लाभ गरिबांना तत्परतेनं मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आज केजरीवाल यांनी जेनिटीक आजाराने ग्रस्त असलेल्या चिमुकल्या कनवची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी, त्याच्या पालकांची आस्थेवाईकपणे चौकशी करत कनवसमवेतही काही वेळ घालवला. मुख्यमंत्र्यांनी स्वत: या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
लहानग्या कनवला जीवघेणा आजार जडला असून त्याच्यावरील उपचारा खर्च तब्बल १७.५ कोटी रुपये एवढा आहे. त्यामुळे, या उपचाराच्या खर्चासाठी आम आदमी पक्षाने पुढाकार घेत त्याच्या पालकांना क्राऊड फंडींगच्या माध्यमातून मदत केली. जगभरातील १० हजार मुलांना हा आजार असून भारत देशातील ९ मुलांना हा आजार जडला असून त्यात कनवही एक असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिली.
कनवचा जन्म झाल्यापासूनच त्याला SMA नावाचा जेनेटीक आजार आहे. ह्या आजारामुळे शरीराच्या पायापासून ते वरपर्यंतचा सर्वभाग हळू हळू निकामी होत जातो. या आजारामुळे कनवच्याही पायापासूनचा भाग निकामी होत चालला होता. मात्र, क्राऊड फंडींगच्या माध्यमातून १७.५ कोटी रुपये जमा करुन त्याला त्यावरील इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर, त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे.
आपचे खासदार संजीव अरोरा यांनी इंजेक्शनचे पैसे जमा करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. त्यांमुळेच आणि दानशूर लोकांमुळेच कनवला इंजेक्शन देण्यात आले आणि नवं जीवनदान मिळाले. कनवच्या प्रकृतीत हळू हळू सुधारणा होत असून यासाठी मदत करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे, मीडियाचे, सर्व मदतनीसांचे मी मनापासून आभार मानतो, असेही केजरीवाल यांनी म्हटले. तसेच, कनवच्या पुढील स्वास्थपूर्ण आणि निरोग आयुष्यासाठी प्रार्थनाही केल्याचं सांगितलं.