जि.प.घडविणार सरपंचांना पाटोद्याचा दौरा १७८ गावांना संधी : स्वच्छता विभागातर्फे निधीची तरतूद
By admin | Published: March 30, 2016 10:21 PM2016-03-30T22:21:05+5:302016-03-30T22:21:05+5:30
जळगाव- जिल्हा परिषदेतर्फे सध्या हगणदरी मुक्ती व भूमिगत गटारींच्या कामांसंबंधी प्रस्तावित १७८ गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांना आदर्श, निर्मल ग्राम म्हणून देशभरात चर्चेत असलेल्या पाटोदा ता.वाळूंज (औरंगाबाद) या गावाच्या दौर्यावर नेले जाणार आहे.
Next
ज गाव- जिल्हा परिषदेतर्फे सध्या हगणदरी मुक्ती व भूमिगत गटारींच्या कामांसंबंधी प्रस्तावित १७८ गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांना आदर्श, निर्मल ग्राम म्हणून देशभरात चर्चेत असलेल्या पाटोदा ता.वाळूंज (औरंगाबाद) या गावाच्या दौर्यावर नेले जाणार आहे. त्यासंबंधी विविध तालुक्यांचे गटविकास अधिकारी व इतर वरिष्ठांना जि.प.तर्फे सूचना देण्यात आल्या आहेत. या दौर्यासाठी जि.प.तर्फे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून निधीची व्यवस्था केली जाणार आहे. एकाच वेळी शक्य आहे तेवढ्या अधिक सरपंच व ग्रामसेवक यांना पाटोदा येथे पाठविले जाईल. या वृत्तास अतिरिक्त सीईओ संजय मस्कर यांनी दुजोरा दिला आहे. साक्री पं.स.कडून करवून घेणार भूमीगत गटारीसांडपाणी व्यवस्थापनासंबंधी प्रस्तावित गावांमध्ये भूमिगत गटारी बांधण्यासाठी साक्री ता.धुळे येथील पं.स.चे पदाधिकारी, अभियंता व काही ग्रा.पं.च्या सरपंचांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक गावात भूमिगत गटारी व शोषखड्ड्याचा कार्यक्रम घेतला जाईल. त्यासाठी प्लास्टिकचे मोठे पाईप वापरले जातील. साक्री तालुक्यात भूमिगत गटारी बांधकामाचा पॅटर्न निर्माण केला आहे. तेथील अधिकारी व काही सरपंचांनी नुकतेच जिल्हाभरातील १७८ ग्रा.पं.च्या सरपंचांना भूमिगत गटारी किंवा सांडपाणी व्यवस्थापनासंबंधी मार्गदर्शनही केले आहे. असे आहे पाटोदा गावपाटोदा हे औरंगाबाद जिल्ातील साधारणत: पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावाला निर्मल, आदर्श गाव असे सर्वच प्रमुख पुरस्कार मिळाले आहेत. तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते दोन वेळेस गौरव झाला आहे. गावात प्रत्येक घराला रोज २० लीटर शुद्ध पाणी ५ पैसे दरात दिले जाते. सकाळी गरम पाणी अंघोळीसाठी सोडले जाते. गावात १०० मीटर अंतरावर कचरा कुंड्या व थुंकीपात्र, गुळण्या करण्यासाठी बेसीन आहेत. सर्व गल्ल्यांमध्ये पेव्हर असून, प्रत्येक घरात शौचालय आहे. धुणे धुण्यासाठी चार घाट बांधले आहेत. राज्याच्या तीन तत्कालीन अर्थमंत्र्यांनी या गावास निधी प्रदान केला आहे. मंत्रालयातील एक हजार कर्मचार्यांनी या गावास अभ्यासासंबंधी भेट दिली आहे.