पिकअप व्हॅन-ट्रक अपघातात १८ मृत, १६ जखमी

By admin | Published: December 6, 2015 02:06 AM2015-12-06T02:06:57+5:302015-12-06T02:06:57+5:30

जयपूर : राजस्थानातील प्रतापगड जिल्‘ातील धोलापानी ठाणे विभागात शनिवारी पिकअप व्हॅन व ट्रक अपघातात ११ महिलांसह एकूण १८ जणांचा मृत्यू झाला तर अन्य १६ व्यक्ती जखमी झाल्या. शनिवारी सुसाट वेगाने जाणाऱ्या पिकअप व्हॅनने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली असता हा अपघात झाला.

18 dead, 16 injured in pick-up van-truck crash | पिकअप व्हॅन-ट्रक अपघातात १८ मृत, १६ जखमी

पिकअप व्हॅन-ट्रक अपघातात १८ मृत, १६ जखमी

Next
पूर : राजस्थानातील प्रतापगड जिल्ह्यातील धोलापानी ठाणे विभागात शनिवारी पिकअप व्हॅन व ट्रक अपघातात ११ महिलांसह एकूण १८ जणांचा मृत्यू झाला तर अन्य १६ व्यक्ती जखमी झाल्या. शनिवारी सुसाट वेगाने जाणाऱ्या पिकअप व्हॅनने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली असता हा अपघात झाला.
धोलापानी ठाण्याचे पोलीस अधिकारी रतनलाल यांनी सांगितले की, पिकअप व्हॅन ट्रकवर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात १२ व्यक्तींचा घटनास्थळी मृत्यू झाला तर अन्य सहा जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींपैकी १५ व्यक्तींना उदयपूर येथील तर एकाला प्रतापगड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिकअप व्हॅनमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्ती छोटी सादडी येथे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. मृतांची अद्याप ओळख पटलेली नसून पोलीस चौकशी करीत आहेत. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री साहायता निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपये व गंभीर जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला २५ हजार रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी २५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 18 dead, 16 injured in pick-up van-truck crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.