वीज पुरवठा बंद झाल्याने तामिळनाडूतील रुग्णालयात १८ मृत्यू ?
By admin | Published: December 4, 2015 03:07 PM2015-12-04T15:07:56+5:302015-12-04T15:13:32+5:30
वीज पुरवठा बंद झाल्याने तामिळनाडूतील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेल्या १८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
Next
ऑनलाईन लोकमत
चेन्नई, दि. ४ - मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या तामिळनाडूत एका रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेल्या १८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. एमआयओटी रुग्णालयात उपचार घेणा-या १८ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.
तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली तेव्हा एमआयओटी रुग्णालयात ५७५ रुग्ण उपचार घेत होते. त्यातील ७५ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. प्रकृती गंभीर असलेल्या अन्य ५७ रुग्णांना दुस-या रुग्णालयात हलवल्याचे तामिळनाडूचे आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन यांनी सांगितले.
१८ रुग्णांच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र चौकशी सुरु केली आहे असे राधाकृष्णन यांनी सांगितले. मुसळधार वृष्टीमुळे तामिळनाडूतील अनेक भागांमध्ये अजूनही वीज पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही.