१८ धरणे आंदोलन जोड

By admin | Published: December 18, 2014 10:39 PM2014-12-18T22:39:36+5:302014-12-18T22:39:36+5:30

अखिल भारतीय नौजवान सभा

18 Dham movement movement | १८ धरणे आंदोलन जोड

१८ धरणे आंदोलन जोड

Next
िल भारतीय नौजवान सभा
नागपूर : भिवंडी निजामपूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, आयुक्त - उपायुक्तांना निलंबित करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय नौजवान सभेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
प्रमुख मागण्या : भिवंडी निजामपूर महापालिका आयुक्त जीवन सोनावणे, उपायुक्त विजय म्हसाळ यांना निलंबित करावे, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, भिवंडीतील ९० नगरसेवकांच्या मालमत्तेची चौकशी करावी, भिवंडीतील रस्ते दुरुस्त करावे, रामनगर - गायत्रीनगर येथे सुरू असलेले डम्पिंग ग्राऊंड बंद करावे, वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षकाला निलंबित करावे, शातीनगर ते मंडईपर्यंत अनधिकृतपणे वाहन पार्क करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, विना कागदपत्र व विना परवाना असलेले रिक्षा जप्त करण्यात यावे, १६ वर्षांच्या वर वय असलेल्या नागरिकांचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करण्यासाठी जन्माचा पुरावा व प्रतिज्ञापत्र तपासणी केल्यानंतरच नाव समाविष्ट करण्यात यावे, शिधापत्रिका हरविले असल्यास, ते खराब झालेले असल्यास दुय्यम शिधापत्रिका तयार केल्यावर अन्न सुरक्षा योजनेत शिधापत्रिकाधारकाचा समावेश कराव आदी मागण्यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय मातंग महासंघ
नागपूर : मातंग समाज अभ्यास आयोगाच्या मुख्य शिफारशीनुसार मांग, मातंग व तत्सम जातींना वेगळे आरक्षण देण्यात यावे, यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मातंग महासंघाच्या वतीने आयोजित साखळी उपोषणाची गुरुवारी सांगता करण्यात आली.
प्रमुख मागण्या : मांग, मातंग समाजाला वेगळे ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, क्रांतिगुरू लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशीनुसार शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, महाराष्ट्र शासनाने मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचवार्षिक विकास आराखडा तातडीने तयार करावा, राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद करावी, पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेत मातंग विकास राज्य संशोधन केंद्र स्थापन करावे, संगमवाडी पुणे येथे आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
नेतृत्व : महादेव जाधव कार्यकर्ते : नत्थू अडागळे, अजित इंगळे, शंकर वानखेडे, अशोक भावे, भारत डोंगरे, चंद्रकांत वानखेडे, विनोद लोखंडे, राजू सोरगिले, अमोल खंदार, बाबूराव वाघमारे, प्रकाश उकुंडे, राजेश खंडारे, श्रीराम जोंधळेकर, प्रा. अरविंद डोंगरे आदी.

Web Title: 18 Dham movement movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.