भारतात 18 दशलक्ष लोक गुलामगिरीच्या कचाट्यात

By admin | Published: May 31, 2016 05:39 PM2016-05-31T17:39:21+5:302016-05-31T17:47:34+5:30

सर्वाधिक जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात अनेक लोक मॉडर्न गुलामगिरीच्या कचाट्यात जगत असल्याचे एका अहवालावरुन सांगण्यात आले आहे.

18 million people in India are in slavery | भारतात 18 दशलक्ष लोक गुलामगिरीच्या कचाट्यात

भारतात 18 दशलक्ष लोक गुलामगिरीच्या कचाट्यात

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31  - सर्वाधिक जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात अनेक लोक मॉडर्न गुलामगिरीच्या कचाट्यात जगत असल्याचे एका अहवालावरुन सांगण्यात आले आहे. 
मानवी हक्कांसाठी काम करणा-या वॉक फ्री फाउंडेशन या संस्थेकडून जगभरातील 167 देशांमध्ये यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आले. यात मजूर म्हणून कराराद्वारे काम करणारे, बळजबरीने भीक मागणारे, सेक्स वर्कर्स आणि  बालकामगार यांच्या समावेश करण्यात आला. त्यानुसार 1.4 टक्के लोकसंख्या असलेल्या भारतात 18 दशलक्ष लोक मॉडर्न गुलामगिरीत वावरत असल्याचे दिसून आले आहे. 
याचबरोबर, या सर्वेक्षणानुसार जगभरात 45.8 दशलक्ष लोक आधुनिक गुलामगिरीच्या दुनिनेत जगत आहेत. त्यात जास्तकरुन भारत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश आणि उझबेकिस्तान या देशातील लोकांचा समावेश आहे. 

Web Title: 18 million people in India are in slavery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.