१८ मार्केट ताब्यात घेण्याच्या हालचाली मनपा : किरकोळ वसुली विभागाकडे आयुक्तांनी दिला प्रस्ताव
By admin | Published: December 3, 2015 12:36 AM2015-12-03T00:36:42+5:302015-12-03T00:36:42+5:30
Next
>जळगाव : महापालिका अधिनियम कलम ७९ ब नुसार शहरातील १८ मार्केटमधील गाळे ताब्यात घेण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी बुधवारी किरकोळ वसुली विभागाकडे प्रस्ताव पाठविला असून याबाबत प्रस्ताव तपासून तत्काळ पुढे कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. राज्य सरकारने ठराव क्रमांक १३५ वरील सुनावणीचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. तत्पूर्वी मनपाने ७९ ब नुसार १८ मार्केटमधील गाळे सील करावेत, असा ठराव २४ नोव्हेंबरला झालेल्या महासभेत झाला होता. त्यानुसार आयुक्तांनी प्रस्ताव तयार केला असून तो किरकोळ वसुली विभागाकडे सादर केला आहे. ७९ ब नुसार महापालिका मालकीची कोणतीही मालमत्ता भाड्याने देताना किंवा तिची विक्री करताना बाजारमूल्यापेक्षा कमी किंमतीत देऊ नये, असा नियम आहे. त्यामुळे किरकोळ वसुली विभागाकडे आयुक्तांनी प्रस्ताव सादर करून तपासणी करण्याचे सांगितले आहे.