इस्लामसाठी १८ वर्षीय आयशाचा क्रिकेटला अलविदा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 05:31 AM2023-07-22T05:31:13+5:302023-07-22T08:38:02+5:30
रूढी-परंपरा जपणाऱ्या कुटुंबातील
कराची : आयशा नसीम. पाकिस्तानची १८ वर्षांची महिला क्रिकेटपटू. दिग्गज वसीम अक्रमने या खेळाडूला प्रतिभावान संबोधले होते. त्याच आयशाने इस्लामची सेवा करण्यासाठी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला.
कारकीर्द सुरू करण्याच्या वयात या आक्रमक फलंदाजाने थांबण्याचा निर्णय घेतला. पाकच्या महिला संघाची कर्णधार नीदा दार आणि पीसीबीने तिचे मन वळविण्याचा प्रयत्न केला; पण प्रयत्न अपुरे पडले. शिबिरासाठी पाचारण करण्यात येताच आयशाने क्रिकेट सोडत असल्याचे फेब्रुवारीतच बोर्डाला कळविले होते, असे सूत्रांनी सांगितले. इस्लामच्या सिद्धांतानुसार आयुष्य जगायचे असल्याने हा माझा वैयक्तिक निर्णय असल्याचे आयशाने सांगितले.
‘मुस्लीम म्हणूनही तू खेळृू शकतेस,’ असे सहकारी खेळाडूंनी आयशाला सांगितले आणि तिचे मन वळविण्याचा प्रयत्न करून पाहिला; पण तिने फेरविचार करण्यास नकार दिला. आयशाने देशासाठी चार वन डे आणि ३० टी-२० सामने खेळले आहेत.
रूढी-परंपरा जपणाऱ्या कुटुंबातील
याआधी पाकचे पुरुष क्रिकेटपटू सईद अन्वर, इंझमाम उल हक, मोहम्मद युसूफ, सकलेन मुश्ताक आणि मुश्ताक अहमद हे इस्लामची सेवा करीत आहेत. अन्वरने-२००२ला मुलीच्या मृत्यूनंतर क्रिकेट सोडून दिले. इंझमाम, युसूफ, मुश्ताक आणि सकलेन हे तबलीगी जमातशी जुळल्यानंतरही क्रिकेटवर भाष्य करतात.