18 वर्षांची तरूणी बनली आई, 12 वर्षाच्या मुलावर गुन्हा
By admin | Published: November 7, 2016 04:23 PM2016-11-07T16:23:54+5:302016-11-07T16:32:24+5:30
पोलिसांनी 12 वर्षाच्या एका मुलाविरोधात 18 वर्षाच्या तरूणीला गर्भवती केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलावर ज्यूवेनाइल जस्टिस कायद्याच्या कलम 75 नुसार गुन्हा
Next
ऑनलाइन लोकमत
कोच्ची, दि. 7 - कोच्ची येथील कालामसरी पोलिसांनी 12 वर्षाच्या एका मुलाविरोधात 18 वर्षाच्या तरूणीला गर्भवती केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलावर ज्युवेनाइल जस्टिस कायद्याच्या कलम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
तरूणीने एका खासगी रूग्णालयात बाळाला जन्म दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्या रूग्णालयावरही गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत पोलिसांना माहिती न दिल्याने पोलिसांनी रूग्णालयावर पॉस्को कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. ती तरूणी अल्पवयीन असून 18 वर्ष पूर्ण करण्यासाठी अजून दोन महिने बाकी आहेत असं पोलिसांनी सांगितलं. तर, रूग्णालय प्रशासनाने तरूणीची 18 वर्ष पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे.
आम्हाला जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हाच आम्ही सामाजिक संस्थांना याबाबत माहिती दिली होती, तसेच तरूणीला 4 नोव्हेंबरला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावरही आम्ही त्या संबंधीची सर्व कागदपत्रं सामाजिक संस्थांना सोपवली असं स्पष्टीकरण रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
दुसरीकडे, तरूणीच्या आजी-आजोबांनी बाळाचं संगोपन करण्यास असमर्थता दर्शवत बाळाला बाल कल्याण आयोगाकडे सोपवलं आहे. आवश्यकता असेल तर तरूणी आणि त्या आरोपी मुलाची डीएनए टेस्ट करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.