१८०० विद्यार्थी सादर करणार कलाविष्कार युवारंग महोत्सव : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा पथसंचलन नाही

By admin | Published: January 5, 2016 11:41 PM2016-01-05T23:41:02+5:302016-01-05T23:41:02+5:30

(धुळे, नंदुरबारसाठी/मुख्य २वर घेत आहोत)

1800 students present at the Artventure Yuvarang Festival: There is no current path for students' safety | १८०० विद्यार्थी सादर करणार कलाविष्कार युवारंग महोत्सव : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा पथसंचलन नाही

१८०० विद्यार्थी सादर करणार कलाविष्कार युवारंग महोत्सव : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा पथसंचलन नाही

Next
(ध
ुळे, नंदुरबारसाठी/मुख्य २वर घेत आहोत)
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि एस.एस.बी.टी. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी महाविद्यालयातर्फे युवारंग महोत्सवाला गुरुवारी, ७ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. महोत्सवात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्‘ातील ११६ महाविद्यालयातील १८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून हे विद्यार्थी त्यांच्या कलेचा आविष्कार येथे सादर करणार आहेत, अशी माहिती विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा. सत्यजित साळवे यांनी पत्रपरिषदेत दिली.
एस.एस.बी.टी. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्टे टेक्नोलॉजी महाविद्यालयातील चर्चासत्र सभागृहात मंगळवारी पत्रपरिषद झाली. यावेळी प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, विष्णू भंगाळे, उमविचे जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील, अनिल लोहार, सहयोगी प्रा. कृष्णा श्रीवास्तव उपस्थित होते.
७ भव्य रंगमंच
सहभागी युवा कलाकारांना त्यांच्यातील उपजत कलागुण सादर करण्यासाठी सात रंगमंच तयार करण्यात आले आहे. त्या रंगमंचला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य रंगमंच, संत मुक्ताई रंगमंच (जी-१४), खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी रंगमंच (खोली क्रमांक २०८), भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (खोली क्रमांक ३०८), लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल रंगमंच (खोली क्रमांक ३१७), गणिततज्ज्ञ भास्कराचार्य रंगमंच (प्रशासकीय इमारतीतील दुसरा मजला) कला महर्षी केकी मूस रंगमंच ( आयट सेमिनार हॉल) अशी नावे देण्यात आली आहे.
सिनेकलावंत स्वप्नील जोशी यांची उपस्थिती
७ रोजी सकाळी दहा वाजता मुख्य रंगमंचावर युवारंग महोत्सवाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होईल. यावेळी सुप्रसिद्ध सिनेकलावंत स्वप्नील जोशी, ट्रस्टचे विश्वस्त रावसाहेब शेखावत व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
५ कलाप्रकार; २५ स्पर्धा
महोत्सवात विद्यार्थ्यांना पाच मुख्य कला प्रकारातील २५ उप कला प्रकारात विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. त्यात.
७ रोजी : मूकनाट्य, समूह गीत (भारतीय), काव्यवाचन, वादविवाद, भारतीय लोकगीत, रांगोळी, चित्रकला, इन्स्टॉलेशन, फोटोग्राफी
८ रोजी : समूहलोक नृत्य, सुगम संगीत, मीमिक्री, शास्त्रीय वादन (ताल वाद्य व सूर वाद्य), वक्तृत्व, लोकसंगीत, समूह गीत व सुगम गायन, व्यंगचित्र , कोलाज,
९ रोजी : विडंबन नाट्य, शास्त्रीय नृत्य व शास्त्रीय गायन

Web Title: 1800 students present at the Artventure Yuvarang Festival: There is no current path for students' safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.