मुसळधार पावसाचे तामिळनाडूत १८९ बळी

By admin | Published: December 2, 2015 10:00 AM2015-12-02T10:00:38+5:302015-12-02T16:32:15+5:30

तामिळनाडूतील पावसाचा तडाखा अद्यापही कमी झाला नसून संपूर्ण राज्यात पावासमुळे आत्तापर्यंत १८९ लोकांचा मृत्यू झाला आहे

189 victims of heavy rains in Tamil Nadu | मुसळधार पावसाचे तामिळनाडूत १८९ बळी

मुसळधार पावसाचे तामिळनाडूत १८९ बळी

Next
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २ - तामिळनाडूतील पावसाचा तडाखा अद्यापही कमी झाला नसून संपूर्ण राज्यात पावासमुळे आत्तापर्यंत १८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. बंगालच्या खाडीतील नैऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चेन्नईसह तामिळनाडूच्या इतर भागातही पावसाचा जोर अद्याप कायम असून संपूर्ण चेन्नई शहर पाण्याखाली गेले आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे, रस्ते व विमान वाहतुकीलाही फटका बसला आहे. दरम्यान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोलिस, अग्निशामक दल, राष्ट्रीय व राज्य आपत्कालीन दल व तटरक्षक दल सज्ज ठेवण्यात आले आहे. 
दरम्यान पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून पावसामुळे चेन्नईतील अनेक घरात पाणी शिरले आहे. शहारतील शाळा बंद ठेवण्यात आल्या असून परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून कोसळणा-या पावसाचा फटका विमानसेवेलाही बसला असून धावपट्टीवर भरपूर पाणी साचल्याने चेन्नई विमानतळ दिवसभरासाठी बंद करण्यात आले असून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 
दरम्यान मुख्यमंत्री जयललिता यांनी पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला असून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. 
 
> चेन्नईच्या जिल्हाधिका-यांनी दिला पूराचा इशारा, नदीकाठी रहाणा-या नागरीकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले. 
> मुसळधार पावसामुळे चेन्नईत अनेक भाग पाण्याखाली, ट्रेन, बस या अत्यावश्यक सेवा अनेक भागात बंद.
> खबरदारीचा उपाय म्हणून काही भागांमध्ये विद्युतपुरवठा केला बंद.
> चेन्नईमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. 
> इमारतीमध्ये पुराचे पाणी घुसले, अडकलेल्या नागरीकांच्या सुटकेसाठी बोटी बोलवल्या. 
> एनडीआरएप तसेच लष्कराचे पथक लोकांच्या मदतीसाठी तैनात
> पूरग्रस्त तामिळनाडूला केंद्र सरकार संपूर्ण सहकार्य करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आश्वासन
> बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टयामुळे तामिळनाडूमध्ये पुढचे २४ तास पावसाची संततधार कायम रहाणार. पुडूचेरीमध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज.  
> राज्य आपत्ती मदत निधीतून तामिळनाडूला ५०९ कोटी मंजूर केल्याची केंद्रीय   गृहमंत्रालयाची माहिती. 
> चेन्नईतील उपनगर तंबाराममध्ये सर्वाधिक ४९ मिमी पाऊस
> विशाखापट्टणम येथून नौदल युध्दनौका आयएनएस ऐरावत मदत साहित्य घेऊन चेन्नईच्या दिशेने रवाना 

Web Title: 189 victims of heavy rains in Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.