जम्मू-काश्मीर : दगडफेकीमुळे CRPFच्या वाहनाला अपघात, 19 जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2018 12:10 PM2018-05-27T12:10:52+5:302018-05-27T12:10:52+5:30
जम्मू काश्मीरमधील केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) गाडीवर फुटीरवाद्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे गाडीला अपघात झाला.
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) गाडीवर फुटीरवाद्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे गाडीला अपघात झाला. या अपघातात गाडीतील 19 जवान जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यामध्ये काहींना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दगडफेक करणाऱ्या अज्ञात फुटीरवाद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी (27 मे)पहाटेच्या सीआरपीएफचे जवान एका टेम्पोतून श्रीनगरहून दुसऱ्या शहरात जात असताना ही घटना घडली आहे. शाम लाल पेट्रोल पंपाजवळ जवानांची गाडी येताच काही फुटीरवाद्यांनी तुफान दगडफेक केली. यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी उलटली. या अपघातामुळे गाडीतील 19 जवान जखमी झाले.
19 CRPF jawans were injured after the vehicle they were in skidded off the road in Srinagar. According to the CRPF, the incident took place after stones were pelted on the vehicle. #JammuAndKashmirpic.twitter.com/N6yJOr5WOc
— ANI (@ANI) May 27, 2018