१९ दिवसात कोषागारकडे अडीच हजारावर बिले मार्च एण्डिगची धावपळ : शासनाच्या सुधारित आदेशाने झाला भार कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2016 12:24 AM2016-03-29T00:24:22+5:302016-03-29T00:24:22+5:30
जळगाव : मार्च महिन्याच्या अखेरीस विविध कार्यालयांतर्फे बिले काढण्यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाकडे बिलांच्या मागणीच्या देयकांचा पाऊस पडत आहे. १९ दिवसात तब्बल दोन हजार ६०६ देयक या कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे.आगामी तीन दिवसात किमान एक हजार ते १२०० बिले येण्याची शक्यता आहे.
Next
ज गाव : मार्च महिन्याच्या अखेरीस विविध कार्यालयांतर्फे बिले काढण्यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाकडे बिलांच्या मागणीच्या देयकांचा पाऊस पडत आहे. १९ दिवसात तब्बल दोन हजार ६०६ देयक या कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे.आगामी तीन दिवसात किमान एक हजार ते १२०० बिले येण्याची शक्यता आहे.शासकीय कार्यालयांकडून बिलांसाठी धावपळमार्च महिना अखेर आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात धावपळ सुरू आहे. कर्मचार्यांचे पगार, प्रवास भत्ते तसेच अन्य बिले तयार करून ते मंजूर करून घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बसून काम पूर्ण केले जात आहे. तयार बिल मंजुरीसाठी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहे. मार्च महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून बिलांच्या अर्जांचा पाऊस पडत आहे.वर्षभरात आली २६ हजार देयकेजिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाकडे १ एप्रिल २०१५ ते २३ मार्च २०१६ पर्यंत शासकीय कार्यालयांकडून २६ हजार १०३ देयके प्राप्त झाली आहेत. यात मार्च महिन्याच्या १९ दिवसात तब्बल दोन हजार ६०६ देयके प्राप्त झाली आहेत. सुधारित आदेशाने झाला भार कमीमार्च महिन्याच्या अखेरीस कोषागार कार्यालयात सादर होणार्या देयकांची संख्या नियंत्रित करण्यासंदर्भात शासनाने १० मार्च रोजी आदेश काढला आहे. त्यात प्रवास भत्ता, आस्थापना विषयक पुरवणी देयके, वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयके १५ मार्चपर्यंत कोषागार कार्यालयाकडे सादर करण्याची सूचना केली आहे. २०१५/१६ चे सुधारित अंदाज मान्य झाल्यानंतर वजा अनुदानावरील देयके कोषागारात पारीत करणार नसल्याचे या आदेशात म्हटले आहे. या निर्णयामुळे १५ मार्चपर्यंत प्रवास भत्ता, पुरवणी देयके तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके आल्याने मार्च महिन्याच्या अखेरीस येऊन पडणारे बिले आणि कामाचा अतिरिक्त ताण कमी झाला आहे.पोलीस व महसूलची सर्वाधिक बिलेजिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाकडे पोलीस प्रशासन, जिल्हा महसूल प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, उच्च शिक्षण विभाग तसेच पे-युनिट (माध्यमिक व प्राथमिक) या कार्यालयातील सर्वाधिक बिलांचा समावेश आहे. १४ व १५ मार्च रोजी या कार्यालयांकडून प्रवास भत्ता, पुरवणी देयके तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांची सर्वाधिक बिले जिल्हा कोषागार कार्यालयाकडे प्राप्त झाले.