उत्तर प्रदेशमध्ये वादळामुळे 19 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 14:50 IST2019-06-07T14:49:09+5:302019-06-07T14:50:28+5:30
उत्तर प्रदेशमध्ये वादळामुळे 19 जणांचा मृत्यू झाला आहे. 41 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये वादळामुळे 19 जणांचा मृत्यू
लखनऊ - उत्तर प्रदेशमध्ये वादळामुळे 19 जणांचा मृत्यू झाला आहे. 41 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी (7 जून) उत्तर प्रदेशच्या गृहमंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. वादळामुळे मैनपूरीमध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या आपत्तीनंतर परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच वादळाचा फटका बसलेल्यांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत.
वादळामुळे मैनपूरीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर इटाह 3, कासगंज 3, मोरादाबाद, बदायूँ, पीलिभीती, मथुरा, कनौज, संभल,गाझियाबाद या जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील विविध भागात गुरुवारी (6 जून) वादळ आलं. या वादळामध्ये आतापर्यंत एकूम 19 जणांचा मृत्यू झाला आहे तर 41 जण जखमी झाले आहेत.