शिक्षणाधिकार्‍यांसह १९ कर्मचार्‍यांना नोटिसा वरिष्ठांकडून तपासणी

By Admin | Published: October 13, 2015 08:50 PM2015-10-13T20:50:10+5:302015-10-13T21:14:16+5:30

जळगाव- या ना त्या कारणामुळे नेहमी चर्चेत राहणार्‍या प्राथमिक शिक्षण विभागातील प्रभारी शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांच्यासह १९ कर्मचार्‍यांना सामान्य प्रशासन विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.

19 employees with education officials examined by notice seniors | शिक्षणाधिकार्‍यांसह १९ कर्मचार्‍यांना नोटिसा वरिष्ठांकडून तपासणी

शिक्षणाधिकार्‍यांसह १९ कर्मचार्‍यांना नोटिसा वरिष्ठांकडून तपासणी

googlenewsNext

जळगाव- या ना त्या कारणामुळे नेहमी चर्चेत राहणार्‍या प्राथमिक शिक्षण विभागातील प्रभारी शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांच्यासह १९ कर्मचार्‍यांना सामान्य प्रशासन विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.
या नोटिसा बजावल्याने शिक्षण विभागाच्या कामात प्रगती आहे की नाही याची पुन्हा तपासणी होणार आहे. शिक्षण विभागात मध्यंतरी अध्यक्षांनी अचानक भेट दिली होती. त्या वेळेस कमाल कर्मचारी टेबलवर नव्हते. तर एक कर्मचारी रजेचा अर्ज न देताच कार्यालयात अनुपस्थित होता. त्यानंतर स्थायी समितीच्या सभेतही सदस्यांनी शिक्षण विभागातील शिक्षणसेवकांची नियुक्तीचा घोळ व इतर मुद्द्यांवरून तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन सामान्य प्रशासन विभागाने शिक्षण विभागातील सर्व कर्मचार्‍यांकडे किती काम आहे, किती फायली प्रलंबित आहेत व त्याला जबाबदार कोण याची तपासणी केली. त्यात सर्वच टेबलवर फायली प्रलंबित ठेवल्याचे दिसून आले. यामुळे आंतरजिल्हा बदली, बदली, नियुक्ती, शालेय पोषण आहार, आस्थापना, वस्तीशाळा, अपंग युनिटचे शिक्षक व इतर टेबलवरील काम पाहणार्‍या कर्मचार्‍यांसह शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर, विस्तार अधिकारी, कक्ष अधिकारी, कार्यालय अधीक्षक आदींना नोटिसा बजावल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदू वाणी यांनी दिली.

Web Title: 19 employees with education officials examined by notice seniors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.