भारतीय जवानांची १९ तास पायपीट, चिनी सैनिकांना हुसकावले, अरुणाचल प्रदेशात रस्त्यांची दुरावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 01:14 AM2018-01-14T01:14:43+5:302018-01-14T01:15:21+5:30

अरुणाचल प्रदेशातील तूतिंग भागात चिनी सैनिक घुसखोरी करीत असल्याचे कळताच भारतीय जवानांनी अतिशय वाईट रस्त्यांवरून १९ तास पायी प्रवास करून सीमेवर मजल मारली आणि चिनी सैनिकांना हुसकावले, असे उघड झाले आहे.

19 hours of Indian soldiers jailed, Chinese soldiers abducted, road mishaps in Arunachal Pradesh | भारतीय जवानांची १९ तास पायपीट, चिनी सैनिकांना हुसकावले, अरुणाचल प्रदेशात रस्त्यांची दुरावस्था

भारतीय जवानांची १९ तास पायपीट, चिनी सैनिकांना हुसकावले, अरुणाचल प्रदेशात रस्त्यांची दुरावस्था

Next

गुवाहाटी : अरुणाचल प्रदेशातील तूतिंग भागात चिनी सैनिक घुसखोरी करीत असल्याचे कळताच भारतीय जवानांनी अतिशय वाईट रस्त्यांवरून १९ तास पायी प्रवास करून सीमेवर मजल मारली आणि चिनी सैनिकांना हुसकावले, असे उघड झाले आहे.
चीन सीमेवरील तवांग, सिंयांग या जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की, वाहनांतून तिथे पोहोचणे अवघडच असते. तुतिंग हा भाग सियांग जिल्ह्यातील असून, तिथेही वाहनाने जाण्यात असंख्य अडचणी येतात. त्यामुळे भारतीय जवानांना तुतिंगपर्यंत चालत जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. चिनी तुतिंग भागात २८ डिसेंबर रोजी घुसखोरी केली होती. तिथे रस्ता बांधण्यासाठी ते आले होते आणि सोबत त्यासाठीची साधनसामग्रीही त्यांनी आणली होती.
तुतिंग भागातील एका हमालाने चिनी सैनिक घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाºयांना दिली. त्यानंतर लगेचच भारतीय जवानांना तिथे पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या. तुतिंग हे सियांग जिल्ह्यात असून, तेथील रस्त्यांची अवस्था अतिशय भीषण असल्याने जवानांनी तिथे पायी पोहोचण्याचेच ठरवले. अतिशय संवेदनशील भागांतील रस्ते चांगले असणे आवश्यक आहे. पण संपूर्ण अरुणाचल प्रदेशातील रस्त्यांची अवस्था वाईट असून, सियांग व तवांग येथील रस्ते तर वाहने जातील, असेही नाहीत. (वृत्तसंस्था)

रसद नेण्यासाठी ३00 हमाल
आजच्या स्थितीत १२० भारतीय जवान तिथे असून,
त्यांना एका महिन्यासाठीचे अन्नधान्य देण्यात आले
आहे. ही रसद घेऊन जाण्यासाठी ३00 हमालांची मदत घेण्यात आली. तसेच जवान पोहोचण्याआधी जेवणाची
१००० पाकिटे व थंडीत शरीरामध्ये ऊ र्जा निर्माण करण्यासाठी काही हजार चॉकलेट पाकिटे तिथे हेलिकॉप्टरने पोहोचविण्यात आली.

- तेथील रस्ते तर वाईट आहेतच, पण अनेक नद्यांवरील पूलही कच्चे आहेत. त्यावरून वाहन नेणे तर सोडाच,
पण चालत जाणे हीसुद्धा कसरतच असते.

Web Title: 19 hours of Indian soldiers jailed, Chinese soldiers abducted, road mishaps in Arunachal Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.