गंगा नदीत बोट उलटून 19 जणांचा मृत्यू
By admin | Published: January 14, 2017 09:39 PM2017-01-14T21:39:36+5:302017-01-14T21:49:29+5:30
बिहारमधील पाटणा येथे गंगा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 14 - बिहारमधील पाटणा येथे गंगा नदीत बोट उलटून दुर्देवी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. बोटीमध्ये जवळपास 50 प्रवासी होते. मकरसंक्राती निमित्त पतंग उडवून परतत असताना ही दुर्घटना घडली. अंधार पडत असताना संध्याकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली.
बोटीतील 25 जणांनी पोहून किनारा गाठला. आठ जणांची सुटका करण्यात यश आले. अनेकजण बेपत्ता असून एनडीआरएफच्या जवानांकडून शोधकार्य सुरु आहे.
एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. वाचवण्यात आलेल्या आठ जणांवर पाटना मेडीकल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
Patna boat capsize incident: Death toll rises to 19, Rs 4 lakh compensation each to be given to the kin of the deceased persons. pic.twitter.com/aWbQaEnojA
— ANI (@ANI_news) 14 January 2017