१९ लोकप्रतिनिधींचे निलंबन लोकशाहीला घातक : प्रकाश गजभिये
By admin | Published: March 23, 2017 05:15 PM2017-03-23T17:15:35+5:302017-03-23T17:15:35+5:30
१९ लोकप्रतिनिधींचे निलंबन
Next
१ लोकप्रतिनिधींचे निलंबन लोकशाहीला घातक : प्रकाश गजभियेनागपूर : राज्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्याच्या मागणीसाठी लोकशाही पध्दतीने सभागृहात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निलंबित करणे हे लोकशाहीला घातक असून त्यांचे निलंबन त्वरित रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी केली. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून अडीच वर्षात तब्बल नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सभागृहात अर्थसंकल्प सादर होत असताना शेतकऱ्यांच्या वाट्याला काहीच मिळणार नसल्याचे दिसताच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्याही घटना घडल्यात. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठाम भूमिका घेत शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरली. हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, मधुसूदन केंद्रे, संग्राम जगताप, अवधूत तटकरे, दीपक चव्हाण, नरहरी जिरवाळ, वैभव पिचड, दत्तात्रय भरणे आदींनी घेतलेली भूमिका ही राज्याच्या शेतकरी हिताची असल्याने त्यांनी केलेल्या आंदोलनाचे राज्यातील शेतकरी स्वागत करीत आहे, असेही आ. प्रकाश गजभिये यांनी म्हटले आहे.