दादर, कल्याण, ठाकुर्ली, अंधेरीसह १९ स्थानकांचा करणार पुनर्विकास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 06:09 AM2022-12-18T06:09:19+5:302022-12-18T06:09:41+5:30

रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती, चार वर्षांत २४९४ कोटींचा झाला खर्च 

19 stations including Dadar, Kalyan, Thakurli, Andheri will be redeveloped | दादर, कल्याण, ठाकुर्ली, अंधेरीसह १९ स्थानकांचा करणार पुनर्विकास

दादर, कल्याण, ठाकुर्ली, अंधेरीसह १९ स्थानकांचा करणार पुनर्विकास

Next

- हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १९ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यासाच्या आधारावर या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यात मुंबई महानगर क्षेत्रातील दादरसह ७ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. तर राज्यातील पुणे, नाशिक, नांदेड, अमरावती, भुसावळ या प्रमुख रेल्वे स्थानकांचाही पुनर्विकास होणार आहे.

रेल्वे, दळणवळण व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत सांगितले की, या स्थानकांचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येईल. या कामांमध्ये महत्त्वाची शहरे आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना यात प्राधान्य देण्यात येणार आहे. इम्रान प्रतापगढी यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.

या स्थानकांचे काम यापूर्वीच हाती
अजनी, जालना, औरंगाबाद, मुंबई सेंट्रल, ठाणे व नागपूर रेल्वेस्थानके यापूर्वीच मेजर अपग्रेडेशन ऑफ स्टेशन्स पुनर्विकासासाठी हाती घेतली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाला आर्थिक व्यवहारासंबंधीच्या कॅबिनेट कमिटीने यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे.

या स्थानकांचा होणार पुनर्विकास
अकोला, अंधेरी, अमरावती, बांद्रा टर्मिनस, भुसावळ, बोरिवली, दादर, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, लोणावळा, मिरज, नांदेड, नाशिक रोड, पुणे, साईनगर शिर्डी, शिवाजीनगर पुणे, ठाकुर्ली, वर्धा रेल्वेस्थानकांचा पुनर्विकासासाठी अभ्यास करण्यात येणार आहे. 

राज्यातील १०८ रेल्वेस्थानकांचा समावेश
nमहाराष्ट्रातील १०८ रेल्वेस्थानकांचा यापूर्वीच आदर्श स्थानकांच्या योजनेत विकास करण्यात आलेला आहे. देशभरात आदर्श रेल्वे स्थानक योजनेत १२५२ स्थानकांची निवड करण्यात आली. 
nत्यापैकी १२१८ स्थानके आजवर विकसित करण्यात आली आहेत. उर्वरित स्थानकांचा जून २०२३ पर्यंत विकास करण्यात येणार आहे. 
nग्राहक सुविधा योजनेत महाराष्ट्राला रेल्वेकडून सिंहाचा वाटा मिळाला आहे. चार वर्षांत २४९४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे.

Web Title: 19 stations including Dadar, Kalyan, Thakurli, Andheri will be redeveloped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.