अंड्याच्या फोटोचा इन्स्टाग्रामवर विश्वविक्रम!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 06:30 AM2019-01-21T06:30:32+5:302019-01-21T06:30:47+5:30
सोशल मीडियामुळे कधी काय प्रसिद्धीला येईल आणि कशाचा विक्रम होईल, याचा नेम नाही. एक अंडे सध्या इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत असून, ते सर्वाधिक पाहिली गेल्याचा विक्रम झाला आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडियामुळे कधी काय प्रसिद्धीला येईल आणि कशाचा विक्रम होईल, याचा नेम नाही. एक अंडे सध्या इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत असून, ते सर्वाधिक पाहिली गेल्याचा विक्रम झाला आहे. अभिनेत्री कायली जेनर हिच्या सोशल मीडियातील १.८ कोटींच्या विश्वविक्रमाला मागे टाकले आहे. यावर कायली जेनरने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये ती एक अंडे रस्त्यावर फोडत असल्याचे दिसून येत आहे.
सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या अंड्यामध्ये असे काय वेगळे आहे असे म्हणाल तर तुम्हीच ते अंडे पाहा आणि ठरवा. ते सर्वाधिक पाहिले गेले आहे. याबाबतची आकडेवारीही थक्क करणारी आहे. एक अकाऊंट, ८.२ दशलक्ष फॉलोअर्स, फक्त २ पोस्ट्स आणि लाईक्स-कॉमेंटस मिळून अब्जावधीचा प्रतिसाद. याचा कर्ताधर्ता कोण आहे माहितीये का? फक्त १९ वर्षांचा व्हायरल मार्केटिंग गुरू ईशान गोयल.
या अंड्याला जेवढ्या लोकांची पसंती मिळाली आहे ती किती होते माहिती आहे? अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या (३२५.७ दशलक्ष) पंधरा टक्के नागरिकांनी किंवा कॅनडाची लोकसंख्या (३६.७१ दशलक्ष) यांच्या तुलनेत या अंड्याला जास्त पसंती मिळाली आहे.
कोण आहे ईशान गोयल?
अवघ्या १३ वर्षांचा असताना इशानने आपल्या शाळेचा अमेरिकन हार्ट असोसिएशनचा कार्यक्रम घेतला होता व सर्वाधिक पैैसा उभा केला होता. त्यानंतर वयाच्या १४व्या वर्षी त्याने आपली मार्केटिंग फर्म सुरू केली. १५व्या वर्षापर्यंत तर तो अरबपती मार्क क्यूबा यांच्यासाठी काम करीत होता.
>हेच छायाचित्र का निवडले?
यासाठी अंडेच का निवडले गेले, असे विचारले असता, विनोदाच्या मूडमध्ये असलेला गोयल म्हणाला की, ते चांगले दिसते.
परंतु खरे पाहता एखाद्या अंड्याला एव्हढे व्हायरल करण्याची कल्पनाच मूर्खपणाची होती. परंतु सर्वांनी ठरवले आणि लोक त्याच्याशी स्वत: जोडले गेले आणि हा
विक्रम झाला.