“पाकिस्तानात झोपलो होतो, सकाळी डोळे उघडताच अख्खं गाव भारताचा भाग बनलं”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 05:03 PM2021-11-28T17:03:01+5:302021-11-28T17:09:33+5:30
जेव्हा युद्ध संपलं तेव्हा पत्नी त्यांच्या पतीपासून, वडील त्यांच्या मुलापासून आणि भाऊ भावापासून वेगळे झाले होते.
नवी दिल्ली – श्योक नदीच्या काठापासून अवघ्या ३० मिनिटांचा रस्ता आहे परंतु ८६ वर्षीय हाजी शमशेर अली मागील ५० वर्षापासून हे अंतर पार करु शकले नाहीत. सीमेपलीकडेच पाकिस्तानच्या गिलगित-बाल्टिस्तान भागात हाजी अलीचा छोटा भाऊ हाजी अब्दुल कादीर राहतात. या दोन्ही भावांमध्ये दुरावा नशिबाने लिहिला आहे. १६ डिसेंबर १९७१ च्या सकाळी विजयाच्या बातमीसोबतच नवीन देश बनल्याची माहिती समोर आली. सकाळी डोळे उघडताच ते पाकिस्तानात नाहीत असं त्यांना कळालं.
रातोरात नियंत्रण रेषा बदलली होती त्यासोबतच ३५० कुटुंबाचं आयुष्यही बदललं. तुतुर्क आणि लडाखच्या नुब्रा खोऱ्यात ३ आणखी गावं जी १९४७ मध्ये पाकिस्तानच्या ताब्यात होती. ते भारताचा भाग बनले होते. अलीचा मुलगा हुसैन गुल्ली एक ट्रव्हल एजेंट आहे. त्याने सांगितले की, त्यावेळी मी तरुण होतो. शिक्षणासाठी मी लाहौरला जायचो. गावात खुप कमी लोकं होती. त्यात वुद्ध आणि लहान मुलं जास्त होती. जेव्हा युद्ध संपलं तेव्हा पत्नी त्यांच्या पतीपासून, वडील त्यांच्या मुलापासून आणि भाऊ भावापासून वेगळे झाले होते. अली यांचे भाऊ कादिर युद्धावेळी स्कार्दू येथे कामाला गेले होते असं त्यांनी सांगितले.
त्या आठवणींना उजाळा देताना गुल्ली म्हणाले. सुरुवातीला आम्ही जिवंत आहोत की नाही हेच कळत नव्हतं. माझी पत्नी, काकी माझ्यासोबत होती. आम्हाला त्यांची प्रतिक्षा करावी लागली. त्यानंतर स्कार्दूच्या रेडिओवर एका कार्यक्रमात कादीरचं नाव घेतलं गेले. ते ऐकून आमच्या जीवाला शांती मिळाली. रेडिओ पकडून आम्ही खूप रडलो. ही सीमा आमच्या मनावर कोरली गेली. त्यानंतर पत्र, भेटीसाठी खूप काळ वाट पाहावी लागली. दोन्ही देशांकडून व्हिसा मिळणं खूप कठीण होतं. अनेकदा कुटुंबातील जन्म-मृत्यूची बातमीही मिळण्यास वर्ष लोटत होती. अखेर १९८९ मध्ये मक्का येथे दोन्ही भाऊ एकमेकांना हज यात्रेच्या निमित्ताने भेटले.
अलविदा म्हणणं खूप कठीण
४९ वर्षीय फाजिल अब्बास नशिबवान निघाले. त्यांचे मोठे बंधू मोहम्मद बशीर जे त्यावेळी पाकिस्तानात शिक्षण घेत होते. २०१३ मध्ये व्हिसा घेऊन भारतात आले. अब्बास सांगतात की, माझे वडील वाट पाहत निघून गेले परंतु आईला तिच्या छोट्या मुलाला भेटता आले. मी ४२ वर्षानंतर पहिल्यांदा भावाला भेटलो. बशीरच्या स्वागतासाठी गाव सजलं होतं. आम्ही खूप आनंदात होतो. तो २ महिने थांबला आणि पुन्हा निघाला तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते.